विशेष

देव्हाडा घाटातून रेतेची चोरी तिरोडा येथील रेती चोर करतात मोहाडी तालुक्यातील रेती चोरी प्रशासन झोपले घरी गोवकऱ्याच्या तक्रारीस केराची टोपली

Spread the love

 

राजु तुमसरे.

मोहाडी. ता. प्र.

      तालुक्यातील देव्हाडा (खुर्द) गावा जवळून वैनगंगा नदी वाहते या नदीत मौल्यवान रेती साठा उपलब्ध आहे मोहाडी तालुका च्या सीमेस लागून तिरोडा तालुक्याची सीमा आहे त्यामुळे तिरोडा येथील रेतीचोर मोहाडी तालुक्यातील सीमेतून रेतीची चोरी करतात परंतु भंडारा जिल्ह्यातील प्रशासन झोपी गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात रेतीची चोरी होत असून गावकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीस केराची टोपली दाखविण्यात आली आहे.

      भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुका याची सीमा देव्हाडा (खुर्द) गावापर्यंत आहे त्यानंतर गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्याची सीमा सुरू होते या सीमेदरम्यान देव्हाडा गावा लगत नाला आहे. नाल्या अलीकडे देव्हाडा (खुर्द) व नाल्यापलीकडे तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा या गावाची सीमा सुरू होते मिळालेल्या माहिती नुसार तिरोडा तालुक्यातील घाट कुरुडा हा घाट लिलाव झाला आहे परंतु त्याच घाटास लागून मोहाडी तालुक्यातील देव्हाडा (खुर्द )घाट आहे या घाटातील रेती तिरोडा येथील तिरोडा येथील रेती तस्कर लील्लारे व बचवानी हे आपले ट्रॅक्टर लावून मोहाडी तालुक्यातील देव्हाडा घाटातून रेती काढून गोंदिया जिल्ह्यातील घाटकुरोडा येथे साठवतात व ती रेती परवाना देऊन नागपूर गोंदिया रामटेक वर्धा अमरावती येथे दिली जाते.

     या संबंधात गावकऱ्यांनी तक्रार दि.5 डिसेंबर रोजी तहसीलदार मोहाडी. पोलीस स्टेशन करडी. तलाठी देव्हाडा यांना देण्यात आली . दि.6 डिसेंबर रोजी तत्कालीन तहसीलदार सुरेश वाघचौरे यांनी मोका चौकशी करून रेती तस्करांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. रेती चोरांनी दि.7 व 8 तारखेस उत्खनन बंद ठेवले व दिनांक.9 डिसेंबर पासून सातत्याने उत्खनन सुरू आहे. परंतु भंडारा जिल्हातील उपविभागीय अधिकारी. आणि ख णीकर्म अधिकारी. करडी येथील ठाणेदार. तलाठी मंडळ अधिकारी निद्रावस्थेत असल्याचे दिसून येते देव्हाडा (खुर्द )नदीतून हजारो ब्रास रेती चोरी गेली आहे . व जात आहे.

      खाजगी वसुली अधिकारी करतात वसुली.

      तुमसर येथील महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी सेवानिवृत्त तहसीलदार व माडगी येथील एका रेती तस्करास वसुली अधिकारी म्हणून नेमल्याची चर्चा रेती तस्कर मोठ्या प्रमाणात करतात सेवानिवृत्त तहसीलदार हे याआधी तिरोडा येथील तहसीलदार होते व रेती प्रकरणात त्यांच्यावर अँटी करप्शन बिरोने धाड टाकली होती हे विशेष. या वसुली अधिकाऱ्यांसोबत रेती चोरांची माडगी येथील बोंद्रे बियर बारमध्ये याबाबत चर्चा झाली ही खात्रीदायक माहिती हाती आली आहे.

वसुली अधिकारी म्हणून नेमलेले सेवानिवृत्त तहसीलदार हे आता तुमसर येथे करायचे घर करून राहत असून तेतूनच वसुलीच्या गोरख धंदा चालवीत आहेत.

    देव्हाडा येथील वैनगंगा नदीतून चोरी गेलेल्या रेतीचे मूल्यांकन करून ती रोडा येथील रेती चोरांकडून याची वसुली करण्यात यावी व प्रशासनातील दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देव्हाडा येथील नागरिकांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

Pande Sanjay

Related Articles

Back to top button
Close
Close