ब्रेकिंग न्यूज

शेवटी व्हायचं ते झालंच ! ऐश्वर्या मुलीसह माहेरी रवाना ? 

Spread the love
मुंबई ,/ नवप्रहार वृत्तसेवा
                     मागील काही सोशल मीडियावर ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांच्या घटस्फोटा च्या बातम्या व्हायरल होत होत्या.सिनेसृष्टीत  हा प्रकार नवा नाही. पण विषय जर बिगबी अमिताभ बच्चन यांच्या कुटुंबाचा असेल तर चर्चा तर होणारच. ऐश्वर्या आपल्या मुलीला घेऊन  माहेरी निघून गेल्याची चर्चा आहे.
ऐश्वर्या आणि अभिषेक यांनी एकमेकांना सोशल मीडियावर देखील अनफॉलो केलं आहे. या गोष्टीमुळे त्यांच्या घटस्फोटांच्या चर्चांनी आणखी जोर धरला आहे. दोघेही मुलगी आराध्यासाठी एकत्र राहत असून दोघांचं नातं पहिल्यासारखं उरलेलं नाही असं सांगण्यात येतं. दरम्यान दोघांनी त्यांच्या नात्यात एक मोठं पाऊल उचलल्याची माहिती समोर येतेय.
काही दिवसांआधीच ते द आर्चीजच्या प्रीमियरला एकत्र दिसले होते. तेव्हा त्यांच्यात सगळं काही ठिक असल्याचं पाहायला मिळालं होतं. मात्र आता ऐश्वर्यानं बच्चन कुटुंबियांचं घर सोडल्याची माहिती समोर येत आहे. बच्चन कुटुंबियांच्या अत्यंत जवळच्या व्यक्तीनं ही माहिती दिल्याचं सांगितलं जात आहे.
त्याचप्रमाणे काही दिवसांआधी अमिताभ बच्चन यांनी त्यांचा जुहू येथील प्रतिक्षा बंगला हा लेक श्वेता बच्चन हिच्या नावावर केला. श्वेता तिच्या फॅमिलीसह प्रतिक्षा बंगल्यात शिफ्ट झाल्याची माहिती देखील समोर आली होती. अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्या नात्यात कटूता आल्यानं अमिताभ बच्चन यांनी मुलांमध्ये प्रॉपर्टी वाटून टाकली असं म्हटलं जातंय.
What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close