कृषी विभाग आणि आत्मा समीति अंतर्गत रानभाजी महोत्सवाचे आयोजन
भाजी महोत्सवात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग.
नेर:-नवनाथ दरोई
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा व आत्मा समीतेच्या वतीने नेर येथील श्री शिवाजी हायस्कूलच्या प्रागणात रानभाजी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नेर तहसीलचे नायब तहसीलदार संजय भोयर, आत्मा समितीचे अध्यक्ष खुशाल मिसाळ, कृषी अधिकारी दिपाली बिरारीस,हिम्मत देशमुख, मोहन मडावी उपस्थित होते. पाहुण्यांनी बिरसा मुंडा, वसंतराव नाईक याच्या प्रतिमेचे पूजन करून रेबीन कापून उदघाटन केले. पाहूण्याकडून महोत्सवात आलेल्या रान भाज्यांची पाहणी करण्यात आली,यामधे करड कोसला, मशरुम,वावडिंग, हर्रसेल,चवळी, चिंच,अंबाडी, कढीपत्ता,करवंद, शेवगा,कटुले अशा विविध प्रकारच्या राणभाज्या स्टाॅलवर ठेवण्यात आल्या होत्या. हया भाज्या त्रीभुन संघाच्या अध्यक्षा उज्वला महल्ले,कविता शेन्डे,माधुरी कतरे, सुनिता पिसे, वैशाली मोहरकर,वंदना साठवणे,सविता ऊईके,निता ईरपाते,रंजना रंगारी, शेख महम्मद रफीक अब्दुल हमीद, चरणदास रंगारी, चेतन साठवणे यांनी ह्या भाज्या आणून स्टॉलवर ठेवण्यात आल्या होत्या. या महोत्सवाच्या यशस्वी करिता प्रकाश जोल्हे,राजेंद्र वैद्य, अनधा ढोले यांनी अथक परिश्रम घेतले.