महाराष्ट्र शिक्षक पॅनल आयोजित राज्यस्तरीय सेवासन्मान सोहळा यावर्षी नाशिक येथे
खुलताबाद प्रतिनिधी
शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित
महाराष्ट्र शिक्षक पॅनल MSP या व्हाट्सअप ग्रुपचा राज्यस्तरीय सेवासन्मान सोहळ्याचे आयोजन नाशिक येथिल गुरुदक्षिणा हॉल येथे करण्यात आले असल्याचे शिक्षक पँनलचे अध्यक्ष तथा राज्य समन्वयक दिपक चामे,राज्य समन्वयक तथा पँनलचे सचिव सतिष कोळी यांनी आमच्या प्रतिनिधीजवळ बोलताना सांगितले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिपक चामे,प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री किशोरी शहाणे व सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत असतील.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल अर्थात एम एस पी या महाराष्ट्रतील एक नंबरचा नावलौकिक असणाऱ्या शैक्षणिक व्हाटस्अप ग्रुपद्वारे राज्यातील आदर्श शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.वाडी वस्ती वर आमचे शिक्षकवर्ग प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य करीत असतात. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी व इतरांना प्रेरणा मिळावी यासाठी अशा शिक्षकांच्या उत्कृष्ट व आदर्श कार्याचा गौरव म्हणून शिक्षक पॅनल द्वारे हा पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात येतो.
पुरस्कार सोहळा दिनांक 24 मे 2024 रोजी गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड नाशिक येथे
सिनेअभिनेत्री किशोरी शहाणे व सुप्रसिद्ध कवी अनंत राऊत सह शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे.
महाराष्ट्र शिक्षक पॅनल दर दोन वर्षांनी आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रम सोहळा आयोजित करत असतो, यावर्षी हा कार्यक्रम नाशिक येथील गुरुदक्षिणा हॉल,कॉलेज रोड येथे आयोजित करण्यात आला आहे.आजपर्यंत महाराष्ट्र शिक्षक पॅनल कडून खुलताबाद येथे शिक्षकांसाठी ज्ञानरचनावादी शैक्षणिक संमेलन,लातूर येथे शैक्षणिक अभ्यास दौरा,यवतमाळ येथे शिक्षणाच्या वारीत पँनलचा सहभाग व सर्व सहभागी शिक्षकांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले,संभाजीनगर येथे शिक्षक आमदार व पदवीधर आमदार यांच्या उपस्थितीत,पुणे येथे मराठी सिनेअभिनेत्री डॉ निशिगंधा वाड यांच्या हस्ते उद्घाटन व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान, शिर्डी येथे काटा फेम प्रसिध्द कवी नारायण पुरी व मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा फेम कवी अनंत राऊत यांच्या कवितेची मेजवानी सह शिक्षक कवी संमेलन आयोजित केले गेले होते.
पुरस्कार सोहळ्यासाठी महाराष्ट्र शिक्षक पॅनलचे राज्य समन्वयक दिपक चामे(लातूर),मेघाराणी जोशी उपाध्यक्ष(ठाणे),
सतिष कोळी (सचिव-छत्रपती संभाजी नगर),राजश्री पाटील(ठाणे)सहसचिव,
चंद्रकांत गोरगिले(लातूर
कोषाध्यक्ष,गिरीष दारुंटे(नाशिक),रंगनाथ सगर(लातूर),मनिषा पवाळ(पुणे),संध्या वाळूज(पुणे),पंकजकुमार पालीवाल(जळगाव),
भगवान जायभाये(जालना),, पांडुरंग यलमट्टे(लातूर),
श्रीकांत शेंडगे,हिंगोली,चंदू गोरगिले,गोपाळ भुतापल्ले (लातूर),
बाळासाहेब सातपुते,योगेश सुर्यवंशी
राम तळपे (नाशिक),सुरेश चव्हाण (चाळीसगाव) आदी मेहनत घेत आहेत.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन
प्रतिभा कदम,जतीन कदम तर कार्यक्रमादरम्यान
सुवर्णा क्षीरसागर
(स्वरबरसात टीमचा)
भावगीताचा कार्यक्रमाचे देखील आयोजन केले आहे.
शिक्षक फाउंडेशन द्वारा संचलित महाराष्ट्र शिक्षक पँनलच्या शिक्षक सेवा सन्मान सोहळ्याचे यावर्षी प्रथमच शिक्षकांचा आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा हा महिला शिक्षकांच्या पुढाकाराने व त्याच्या नियोजनातून महाराष्ट्रातून 171 शिक्षक शिक्षिकांना त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून सन्मानित करण्यात येणार असल्याने शिक्षकांनी या सेवा सन्मान सोहळ्यात सहभागी होण्याचे आवाहन शिक्षक पँनलच्या वतीने राज्य समन्वयक तथा राज्य सचिव सतिष कोळी यांनी केले आहे.