बॉलिवूड

अभिनेत्री करिश्मा कपूर च्या त्या वक्तव्याने चित्रपट सुष्टीत खळबळ

Spread the love

पतीने मित्रांबरोबर झोपण्याचा दिला होता आदेश

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

चित्रपट सृष्टी नेहमी काही न काही कारणाने चर्चेत असते. कधी मी टू मुळे तर कधी अभिनेत्रीचे करण्यात आलेल्या शोषनामुळे . पण आता सिनेसृष्टी चर्चेत आली आहे ती प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा  कपूर च्या त्या वक्तव्यामुळे. करिश्मा कपूर ने जो गौप्यस्फोट केला आहे. त्यावरून सिनेसृष्टीतील लोक आणि उच्चभ्रू सोसायटीतील लोकांची मानसिकता किती खालच्या दर्जाची असते याचा प्रत्यय आला आहे.

करिश्मा कपूरने  2003 मध्ये दिल्लीतील व्यापारी संजय कपूरसोबत लग्न केलं. पण हा कदाचित त्याच्या आयुष्यातील सर्वात वाईट निर्णय होता. 13 वर्षांनंतर 2016 मध्ये तिने संजय कपूरसोबत घटस्फोट घेतला. दरम्यान त्याच्यासोबत अनेक भयानक घटना घडल्या, त्यापैकी काहींबद्दल जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

बिझनेसमन संजय कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी करिश्मा कपूरने अभिषेक बच्चनसोबत लग्न केलं होतं, मात्र काही कारणांमुळे दोघांचं लग्न होऊ शकलं नाही. अभिषेकसोबतचे लग्न मोडल्यानंतर करिश्मा कपूरने संजय कपूरसोबत लग्न केले.

करिश्मा कपूरने दिल्लीतील एका बिझनेसमनशी लग्न केले ज्याचा 2003 मध्ये घटस्फोट झाला होता. लग्नानंतर दोघांमधील भांडणाच्या बातम्या अनेकदा चर्चेत राहिल्या. करिश्मासोबत लग्न केल्यानंतरही संजय कपूरचे त्याच्या माजी पत्नीसोबत संबंध होते, अशीही बातमी होती.

लग्नानंतर दोघांमध्ये एवढी भांडणे झाली की एकमेकांसोबत राहण कठीण झालं होतं, परिणामी 13 वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.करिश्माने तिच्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं होतं की, सासूबाईंनी मला एक ड्रेस भेट दिला होता. पण मला तो फिट होत नसल्याने मी परिधान केला नाही. त्यावेळी संजय कपूर आईला म्हणाले,”तू तिला मारत का नाही. संजयच्या या बोलण्याने मी खूप हैराण झाले होते”.हनीमूनला गेल्यावर संजयने मला त्याच्या मित्रांसोबत झोपायला सांगितलं होतं, असा गौप्यस्फोट करिश्मा कपूरने केलाय.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Back to top button
Close
Close