शैक्षणिक

प्राचार्य अरुण मोटघरे यांचे निलंबन ; विद्यापीठाने केली कारवाई

Spread the love

 

मोटघरे यांनी स्वतःच्या हस्ताक्षरात बनावट टीसी तयार करून जन्मतारखेत फेरफार केल्याने विद्यापीठाकडून निलंबनाची कार्यवाही

भंडारा( प्रतिनिधी) नोकरीचा जास्तीचा लाभ व जास्तीचा आर्थिक लाभ मिळण्याकरिता स्वतःच्या हस्ताक्षरात बनावट टी .सी. तयार करून जन्मतारखेत फेरफार केल्यामुळे प्राचार्य अरुण मोटघरे कोंढा कोसरा यांचेवर विद्यापीठाकडून निलंबनाची कार्यवाही करण्यात आलेली आहे .याबाबत सविस्तर वृत्त असे की ,भंडारा जिल्ह्यातील कोंढा कोसरा या गावात स्वतः लक्ष्मणजी मोटघरे चारिटेबल ट्रस्ट नागपूर द्वारासंचालित डॉ. अरुण मोटघरे महाविद्यालय तसेच इतर महाविद्यालया द्वारा बरेचसे अभ्यासक्रम चालविल्या जात आहेत. या महाविद्यालयाचे प्राचार्य तथा संस्था अध्यक्ष अरुण एल मोटघरे आहेत . अरुण मोटघरे हे दिनांक 29 /9 /1996 ला सेवादल महिला महाविद्यालय उमरेड रोड नागपूर येथे शारीरिक शिक्षक या पदावर नोकरीवर रुजू झालेत व या महाविद्यालयात त्यांच्या सेवेला बारा वर्षे पूर्ण केल्यानंतर स्वतःच्या कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून 2008 ला आलेत. यांनी नोकरीवर लागते वेळेस शारीरिक शिक्षण महाविद्यालय कामठी या महाविद्यालयाची टी .सी. एम पी एड दिल्ली त्यात जन्मतारीख ही १०/7/ 1967 आहे व यांची वर्ग पहिली ते एम पी एड पर्यंतच्या शिक्षणापर्यंत दाखल खारीज रजिस्टरवर जन्माची नोंद ही दिनांक 10 /7 1964 आहे .परंतु नोकरीवर लागते वेळेस जी टी सी दिली त्यात दिनांक १० /७/ १९६७ अशी नोंद आहे .ही संपूर्ण माहिती या महाविद्यालयाच्या बडतर्फ कर्मचारी व तक्रार करता श्री भाऊराव गंगाराम पंचवटी यांनी माहिती अधिकारातून माहिती मिळवून पोलीस स्टेशन कार्यालय अड्याळ, जिल्हाधिकारी साहेब भंडारा संचालक (उ शी )महाराष्ट्र शासन पुणे, सहसंचालक (उ शी) नागपूर विभाग नागपूर व कुलगुरू रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर तसेच इतर संबंधित प्रशासनाकडे तक्रार दिली .त्या तक्रारीनुसार जिल्हाधिकारी भंडारा यांनी या प्रकरणावर चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश सहसंचालक नागपूर विभाग नागपूर यांना दिले .त्यानुसार सहसंचालक नागपूर विभाग नागपूर या कार्यालयाने इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स कॉलेज नागपूरचे प्रोफेसर डॉक्टर सी पी चौधरी ,मो. इंद्रिस मो. सिद्धीकि, डॉ जी एल वाघमारे अशा तीन लोकांची चौकशी समिती गठित करून दोनदा चौकशी केली. या दोन्ही चौकशी समोर प्राचार्य श्री अरुण एल मोटघरे कोणतेही पुरावे सादर करू शकले नाही .त्यात यांनी बनावट टीसी तयार करून जन्मतारखेत फेरफार केल्याचे सिद्ध झाले. चौकशीचा अहवाल कारवाईसाठी कुलगुरू कुलसचिव रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर यांच्याकडे सहसंचालक उच्चशिक्षण नागपूर यांच्याकडे पाठविले. त्यानुसार विद्यापीठाचे प्राध्यापक कुलगुरू यांनी विद्यापीठ अध्यादेश क्र .2 /2023 नुसार दिनांक 19 /9 /2023 रोजी दुपारी 2.30 वाजता प्राचार्य यांची सुनावणी घेतली या सुनावणीत प्राचार्यांनी सक्षम पुरावे सादर न केल्याने सहसंचालक (उ सी) नागपूर विभाग नागपूर यांच्या चौकशी समितीचा अहवाल व इतर तक्रारीतील पुरावे नुसार प्र कुलगुरू यांनी
उपपकुलसचिव यांना निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश दिले या आदेशानुसार उपकूलसचिव( म.वी)डॉ. रमण मदने यांनी दिनांक 17 /10′ 2023 ला निलंबन केल्याचे पत्र सहसंचालक (उ सी) नागपूर विभाग नागपूर संचालक परीक्षा व मूल्यमापन रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर तसेच संस्था व प्राचार्य यांना पत्र दिले. या पत्रावरून प्राचार्यावर संस्था कारवाही करून विद्यापीठाला अहवाल सादर केल्यानंतर विद्यापीठाद्वारे विद्यापीठाच्या स्टेटस ५३ नुसार बडतर्फ व फौजदारी कारवाई करेल सध्या निलंबनाची कारवाई प्राचार्य वर करण्यात आलेली आहे त्यामुळे प्राचार्य म्हणून श्री अरुण मोटघरे यांचे साक्षरीचे अधिकार संपलेले आहेत .आता लगेच संस्थेला कॉलेजचे प्रशासकीय कामे सुरळीत चालण्याकरिता नव्याने प्राचार्य किंवा प्रभारी प्राचार्यची नेमणूक तात्काळ करावी लागेल अशी माहिती तक्रार करता श्री भाऊराव पंचवटी यांनी एका प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close