सामाजिक

घाटंजी तालुक्यातील शिरोली येथे शेतकऱ्याची आत्महत्या

Spread the love

घाटंजी ता. प्रतिनिधि- सचिन कर्णेवार
घाटंजी -तालुक्यातील मौजा शिरोली येथील अल्पभूधारक आदिवासी शेतकरी शालिक कर्नू तुमराम वय अं 60 वर्ष यांनी आज दुपारच्या दरम्यान आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मृतक शालिक तुमराम यांच्याकडे पाच एकर शेत जमीन असून मागील दोन-चार वर्षांपासून सततच्या नापिकीमुळे व लागवड पेक्षा कमी भाव रेत असल्याने त्यांचा कर्जाचा डोंगर वाढल्याने सतत काळजीत राहत असे दरम्यान कुटुंबाचा गाडा चालवणे कठीण झाल्यामुळे व कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे त्यांनी आज दुपारच्या दरम्यान घरी कोणी नसल्याचे पाहून गळफास घेऊन आत्महत्या केली. मृतकावर शिरोली विविध कार्यकारी सोसायटीचे 36 हजार रुपये थकीत कर्ज असून इतरही खाजगी कर्ज मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांनी टोकाचा निर्णय घेऊन आत्महत्या केल्याचे कळते.
सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान छोटे नातवंड शाळेतून घरी आल्यानंतर आजोबा घरी लटकून दिसल्याने एकच कल्लोळ केला व शेजाऱ्यांना बोलावण्यात आले संबंधित घटनेची तक्रार घाटंजी पोलिसात देऊन शव उत्तरीय तपासणी करिता ग्रामीण रुग्णालय घाटंजी येथे पाठविण्यात आले आहे पुढील अधिक तपास ठाणेदार निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली घाटंजी पोलीस करीत आहे. मृतकाच्या पश्चात पत्नी दोन मुले दोन सुना व नातवंड व मोठा आप्तपरिवार आहे.
००००००००००००

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close