शाशकीय

अबब…..  प्रतिबंधात्मक  कारवाई टाळण्यासाठी मागितली दोन लाखांची लाच

Spread the love

ठाणे / प्रतिनिधी

               वर्तमान काळात सगळ्यांनाच पैशाचा हव्यास असल्याचे पाहायला मिळत आहे. साध्या साध्या गोष्टीसाठी देखील शासकीय कर्मचारी लाखो रुपये मागतात. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून अश्या कर्मचचाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येते.त्यात त्यांची आणि कुटुंबाची बदनामी देखील होते. पण पैश्याच्या हव्यासापोटी त्यांना ते सुद्धा मान्य असते. प्रतिबंधक कारवाई टाळण्यासाठी एका फौजदाराने 2 लाख रुपयांची लाच मागितली. एक लाखावर तडजोड करण्यात आली.  विक्रमसिंह राजपूत असे त्याचे नाव असून तो एमआयडीसी पोलीस ठाण्यात फौजदार म्हणून कार्यरत आहे.  याला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या पोलिसांनी नुकतेच ताब्यात घेतले आहे.

तक्रारदाराच्या मित्रावर एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये दाखल असलेल्या गुन्ह्याचा तपास फौजदार विक्रम रजपूत करीत होते. त्या गुन्ह्यामध्ये मदत करणे व तक्रारदाराच्या मित्रावर यापूर्वी अॅट्रॉसिटी व इतर गुन्हे दाखल असून त्यांच्यावर सीआरपीसी कलम 107 प्रमाणे प्रतिबंधक कारवाई न करण्यासाठी फौजदार रजपूत यांनी स्वतः व तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांच्या नावे म्हणून दोन लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. माने यांची नुकतीच पोलीस उपअधीक्षक म्हणून बढती झाली आहे. तडजोडीमध्ये एक लाख रुपये स्वीकारण्याची तयारी रजपूत यांनी दाखवल्याचे पडताळणी कारवाईमध्ये निष्पन्न झाले. त्यामुळे फौजदार रजपूत यांना ताब्यात घेऊन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पुण्याचे पोलीस अधीक्षक अमोल तांबे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलीस निरीक्षक चंद्रकांत कोळी, पोलीस अंमलदार शिरीपकुमार सोनवणे, श्रीराम घुगे, अतुल घाडगे, संतोष नरोटे, स्वामीराव जाधव, गजानन किणगी, श्याम सुरवसे यांनी केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close