हटके

अबब .… बिहार सरकारने ३ कोटी खर्चून शेतात बांधला पूल

Spread the love

 अररिया (बिहार )/ नवप्रहार डेस्क

                   एकीकडे देशातील अनेक नदी आणि नाल्यांवर पूल नसल्याने लोकांना नदी – नाले पार करताना जीव धोक्यात घालून तो कधी नाव तर कधी अन्य मार्गाने पार करावा लागतो. गावात जायला पूल नसल्याने अनेक वेळा शाळकरी मुलांना पायी नदी – नाल्यातून प्रवास करावा लागत असल्याचे विदारक दृश्य मीडियाच्या माध्यमातून समोर येत असतात. पण बिहार मधून अशी एक घटना समोर आली आहे जे वाचून तुम्हालाही प्रश्न पडेल की देशात भ्रष्टाचार किती बिकांडलाय !

               जिथे नदी – नाले आहेत त्याठिकाणी शासना कडून पूल आणि बंधारे बांधण्यात येतात. पण बिहार राज्यातील अररिया येथे चक्क एका शेतात पूल बांधण्यात आला आहे. आणि यावर तब्बल ३ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. सोशल मीडियावर या पुलाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर या भ्रष्टाचाराला वाचा फुटली आहे.  असे होऊन देखील शासन आणि प्रशासन स्तरावर याबद्दल हास्यास्पद उत्तर देण्यात येत आहे.

सरकार म्हणते की जेव्हा व्हिडिओ काढला तेव्हा. नाल्यात पाणी नव्हते. तर प्रशासनाचे म्हणणे आहे की हा पूल म्हणजे ३ कोटी च्या प्रकल्पाचा एक भाग असून अद्याप काम शिल्लक आहे.  एक अधिकारी तर इतर अशिकाऱ्यांपेक्षा ही चार हात समोर निघाला. त्याचे म्हणणे आहे की ज्या जागेवर बांधकाम सुरू आहे. ती जमीन लोकांनी खाजगी दाखवून कामात अडथळा निर्माण केला त्यामुळे काम रखडले आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेतली असून, चौकशीचे आदेश दिले आहेत.

What’s your Reaction?
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close