राज्य/देश

असे काय झाले ? की गिधाड ठरत आहे चर्चेचा विषय 

Spread the love

हजारीबाग ( झारखंड ) / नवप्रहार डेस्क 

           गिधाड म्हणजे असा पक्षी जो मेलेल्या प्राण्यांचे मांस खावून जिवंत राहतो. शत्रू  कधी काय करतील याचा नेम नाही. हेरगिरी करायला पूर्वी कबुतर आणि ड्रोन च वापर होत होता. पण आता हजारीबाग येथे एक गिधाड सापडले असून त्याच्या पाठीवर एक यंत्र सापडले असून त्यावर ढाका चे नाव आणि क्रमांक कोरलेला आहे.

सध्या या गिधाडाला विष्णुगडमध्ये सुरक्षित ठेवण्यात आले आहे. गिधाडाला लावलेली चिप आणि मेटॅलिक रिंगची सध्या तपासणी केली जात आहे. येथील एसपी अरविंद सिंह यांनी सांगितले की, पकडलेल्या गिधाडाची माहिती मिळाली आहे. पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. या बाबतचा अहवाल देखील मागवला आहे.

येथे सेव्ह एशियन व्हल्चर्स फ्रॉम एक्सटीन्क्शनचे सदस्य डॉ. सत्यप्रकाश यांनी सांगितले की, हे गिधाड लांबचा प्रवास करून हजारीबागमध्ये पोहोचले आहे. हे गिधाड थकलेले आहे तसेच आजारी देखील आहे. हे गिधाड आजारी पडण्यामागे दोन कारणे असू शकतात. एकतर त्याला वाटेत अन्न मिळाले नसावे किंवा त्याने डायक्लोफेनयुक्त मांस खाल्ले असावे. हजारीबाग पूर्व वन विभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, गिधाडावर बांगलादेशी सोलर रेडिओ कॉलर बसवण्यात आले आहे.

विष्णुगढ येथील कोनार धरणातून बांगलादेशातील एक गिधाड पकडण्यात आले आहे. त्याच्या पंखावर एक धातूची अंगठी व एक सोलर यंत्र बसवण्यात आले आहे. या यंत्रावर बांगलादेशची राजधानी ढाकाचे नाव आणि क्रमांक कोरलेला आहे. हजारीबाग पूर्व वनविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे गिधाड वन्य प्राणी संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत शेड्यूल-१ च्या श्रेणीत येते. त्याच्या अंगावर बांगलादेशी सौर रेडिओ कॉलर बसवण्यात आली आहे.

या प्रकरणी गिधाड तज्ज्ञांशी संपर्क साधला असता हे पांढरे आणि राखाडी रंगाचे गिधाड आहे. हजारीबाग पूर्व वनविभागीय अधिकाऱ्यांनी सांगितले की, हे गिधाड वन्य प्राणी संरक्षण कायदा, १९७२ अंतर्गत शेड्यूल-१ च्या श्रेणीत येते. त्यांनी सांगितले की बॉम्बे नॅशनल हिस्ट्री सोसायटीने (BNSHS) दिलेल्या या माहितीनुसार या पक्ष्याचे रेडिओ टॅगिंग रॉयल सोसायटी फॉर द प्रोटेक्शन ऑफ बर्ड्स (RSPB) यूकेने केले होते.

गिधाडांची कमी होणारी संख्या पाहता या गिधाडाला जियो टॅग केले असावे. ज्याचा उद्देश या नामशेष होणाऱ्या या पक्ष्याचे सतत निरीक्षण करणे हा आहे. या पक्ष्याचे टॅगिंग ढाकास्थित आरएसपीबी यूकेच्या टीमने केले आहे, ज्यामुळे त्याच्या पंजावरील अंगठीवर ढाका कोरलेला आहे. BAHS ने विभागासोबत शेअर केलेल्या माहितीनुसार, १५ मे २०२४ रोजी या पक्ष्याला टॅग लावले होते. ०८ ऑगस्ट २०२४ रोजी हजारीबाग जिल्ह्यातील कोनार धरणावर आले. हजारीबागपर्यंत पोहोचण्यापूर्वी या पक्ष्याने एकूण १२१४ किलोमीटरचे अंतर कापले आहे. एकूण ४५ दिवसांच्या प्रवासानंतर सोमवारी हे गिधाड झारखंडमधील हजारीबागला पोहोचले.

हेरगिरीची शक्यतेने खळबळ

बांगलादेशातील राजकीय तणाव आणि हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर भारतात बांगलादेशातून आलेल्या एका उपकरणासह गिधाड सापडल्यानंतर लोकांमध्ये खळबळ उडाली होती. चर्चा सुरू झाली आहे. लोकांना हेरगिरीचा संशय आला. या गिधाडाच्या पायांवर अंगठी आढळली. सोबट एक यंत्र आढळल्याने हा संशय आणखी वाढला. मात्र, या पक्षाची तपासणी केल्यावर ही शक्यता दूर झाली.

सुरक्षित स्थळी गिधाडाची रवानगी

सेव्ह एशियन व्हल्चर्स फ्रॉम एक्सटीन्क्शनचे सदस्य डॉ.सत्यप्रकाश यांनी संगितले की, हे गिधाड लांबचा प्रवास करून हजारीबागमध्ये पोहोचले आहे. त्यामुळे ते सध्या थकले आहेत आणि आजारी देखील आहे. यामागे दोन गोष्टी असू शकतात. एकतर वाटेत खायला मिळाले नाही. किंवा डायक्लोफेनाक औषध असलेले मांस या गिधाडाने खाल्ले असावे. सध्या हे गिधाड विष्णुगडमधील सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close