विशेष

विद्यार्थी खेळत होते एक्का ,बादशहा, राणी आणि शिक्षक करत होता मनमानी

Spread the love

पालघर / नवप्रहार मीडिया 

तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील एक धक्कादायक प्रकार उघड झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. एका शिक्षकाने स्वतःच्या जागी विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी रोजंदारीवर निवृत्त शिक्षकाला ठेवल्याचाही प्रकार घडला आहे.

            पालघर जिल्ह्यातून एक संतापजनक प्रकार समोर आला आहे.  तलासरी तालुक्यातील सूत्रकार डोंगरपाडा या जिल्हा परिषद शाळेतील एका शिक्षकाने  आपल्या जागेवर एका व्यक्तीला मजुरीवर शिकवायला ठेवले होते. तर शाळेतील विद्यार्थी चक्क जुगार खेळत होते. शिक्षण विभागाचे धिंडवडे काढणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्या नंतर खळबळ माजली आहे.

तलासरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सूत्रकार डोंगरपाडा ही इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतची शाळा आहे. या शाळेत केवळ एक शिक्षक आणि चौदा मुले शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांना शिकवायचा कंटाळा येत असल्याने गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या शिक्षकाने स्वतः घरी बसून 300 रुपये रोजंदारीवर एका निवृत्त शिक्षकाला शिकवायला ठेवले आहे. विद्यार्थी पुस्तके सोडून वर्गातच पत्ते घेऊन जुगाराचा डाव मांडत असल्याचे चित्र समोर आले आहे.

दरम्यान, नागरिकांच्या तक्रारीवरुन सूत्रकार डोंगरपाडा येथील शाळेवर बुधवारी (ता. 27) दुपारी भेट देऊन पाहणी केली. यावेळी शाळेत प्रमुख शिक्षक रवी कुमार सुभाष फेरे उपस्थित नसून ते गणपतीसाठी गावी गेल्याचे समजले. तसेच गावी जाताना मुलांना शिकवण्यासाठी 300 रुपये रोजंदारीवर रामा लोतडा या निवृत्त शिक्षकाला ठेवलेले दिसून आले आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
1
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close