ट्रकच्या धडकेत वाहन चालक जागीच ठार ट्रकची व दुचाकीची धडक.

अरविंद वानखडे
यवतमाळ –यवतमाळ कडून घाटंजी कडे जाणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या मोटरसायकलला धडक दिल्यामुळे यात मोटरसायकल तीन वेक्ती विरुद्ध दिशेने प्रवास करीत असताना ट्रक व दुचाकी यांच्या समोरासमोर धडक लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर इतर दोन जखमींपैकी दुसऱ्या जखमीला नागपूर येथे हलविण्यात आले असता त्याच्या मृत्यू नागपूर येथे झाला तर तिसरा जखमी यवतमाळच्या वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात उपचार घेत आहे. हा अपघात यवतमाळ घाटंजी रोडवरील पुलाजवळ रात्री १०.०० वाजता च्या दरम्यान झाला. याप्रकरणी पोलिसांनी ट्रकच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून दोन्ही वाहन जप्त केली आहे.
यासंदर्भात यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी माहिती दिली की ट्रक क्रमांक तीन ७५ डब्ल्यू ८०६७ हे वाहन घाटंजी कडे जात असताना समोरून एम एच २९ ए झेड ९१२४ या क्रमांकाची मोटरसायकल येत होती या दोन्ही वाहनाची समोरासमोर धडक झाली यात मोटरसायकलचा चुराडा झाला आणि यातील तिघेही वेगवेगळ्या ठिकाणी फेकले गेले. यातील एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीर अवस्थेत पडून होता तर तिसरा बसलेल्या अवस्थेत दिसून आला या मोटरसायकलवर कैलास वसंत दाभेकर वय २५ वर्ष दुर्गेश बाबाराव रेड्डी व ३० वर्ष आणि विजय रामू टेकाळे २६ वर्षे राहणार सर्व कारली जिल्हा यवतमाळ येथील रहिवासी आहेत. यांचा जागीच मृत्यू झाला तर दुसरा जखमी नागपूर मृत्युमुखी पडला याप्रकरणी यवतमाळ ग्रामीण पोलिसांनी तिसऱ्या जखमीला वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले तर घटनास्थळाचा पंचनामा करून दोन्ही वाहन ताब्यात घेतली अटक करण्यात आली.