विदेश

वाचा कुठल्या देशातील इमारतीच्या तळघरात सापडले अब्जावधी रुपये

Spread the love

पाकिस्तान / नवप्रहार मीडिया 

                    एकीकडे शेजारी देश पाकिस्तानात मंदीची लाट असून महागाई गगनाला भिडले आहे,. बिकट अर्थव्यवस्थेशी भांडत असलेल्या पाकिस्तानात एका इमारतीच्या तळघरात}5 अब्जावधीचे देशी आणि परकीय चलन सापडले आहे. इमारत रावळपिंडी येथे असून फेडरल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीचे (एफआयए) अधिकारी आश्चर्यचकित झाले.

या तळघरात 13 डिजिटल लॉकर सापडल्याचा दावा करण्यात आला आहे. ते उघडण्याचे प्रयत्न अयशस्वी ठरले. याशिवाय झेलम शहरातही असेच तळघर आणि लॉकर सापडले. जप्त केलेल्या चलनाशिवाय लॉकरमध्ये विदेशी चलनही असल्याचे समजते. पाकिस्तानकडे सध्या एकूण 8 अब्ज डॉलर्सचा परकीय चलन साठा आहे. त्यापैकी 3 अब्ज डॉलर्स आयएमएफकडून, 2 अब्ज डॉलर्स सौदी अरबकडून आणि प्रत्येकी 1 अब्ज डॉलर्स यूएई व चीनकडून प्राप्त झाले आहे. जूनमध्ये चलनवाढीचा दर सुमारे 40 टक्के होता.पाकिस्तानी मीडियाच्या वेगवेगळ्या वृत्तानुसार, गेल्या दोन आठवड्यांपासून एफआयएच्या अनेक पथकांनी परकीय चलनधारक आणि अवैध सावकारीच्या विरोधात कारवाई केली आहे. पाकिस्तान लष्कर आणि आयएसआयही यात मदत करीत आहेत. पाकिस्तानी लष्कराच्या रावळपिंडी मु’यालयापासून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या प्लाझामध्ये चलन लपवून ठेवल्याची माहिती तपास यंत्रणांना मिळाली होती.

रविवारी सकाळी या प्लाझाच्या तळघरावर छापा टाकण्यात आला. 44 अधिकार्‍यांच्या पथकाने झडती घेतली असता काहीही सापडले नाही. दरम्यान, तळघरातील एका भिंतीवर दोन अधिकार्‍यांना संशय आला. तपासादरम्यान भिंतीच्या दुसर्‍या बाजूला कोणतेही बांधकाम नसल्याचे आढळून आले. नंतर ही भिंत पाडण्यात आली. भिंतीच्या पलीकडे असलेल्या अनेक बॉक्समध्ये पाकिस्तानी आणि विदेशी चलन आढळून आले. पाकिस्तान सर्वांत मोठे आश्चर्य म्हणजे 13 डिजिटल लॉकर्स पाहणे. हे सर्व इतर देशांकडून खरेदी केले गेले होते आणि ते उघडण्यासाठी कोणीही नव्हते. ही इमारत मीडिया चॅनलच्या मालकाची आहे. याप्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत एकही डिजिटल लॉकर उघडलेले नाही.

वृत्तवाहिनीच्या वृत्तानुसार, रविवारी संध्याकाळपर्यंत 40 कोटी पाकिस्तानी रुपये जप्त करण्यात आले होते. असे असूनही एफआयएने स्वतःच कोणतीही माहिती दिली नाही, तर मीडियाचा प्रवेशही रोखला. येथेही कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली. एफआयएच्या सूत्रांचा हवाला देत वृत्तवाहिनीने सांगितले की, आतापर्यंत एकही लॉकर उघडलेले नाही. याचे कारण असे की, या अत्यंत मजबूत आणि स्टीलच्या लॉकर्सचे पासवर्ड आरोपींची कडक चौकशी करूनही मिळू शकले नाहीत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close