विशेष

कुत्र्याच्या प्रेमात त्या दोघींनी दिला जीव

Spread the love

लखनऊ/ विशेष प्रतिनिधी

लखनऊ च्या पारा परिसरातील रहिवासी कैलास सिंह यांच्या दोन मुली राधा (24) आणि जिया (22) या मुलींनी मागच्या काही वर्षांपासून जगाशी तोडून दिला होता. त्यांनी घराच्या बाहेर पडणे बंद करून दिले होते. बरे असे नाही कोणत्यांनी समाजात वावरणे बंद केले होते. तर त्या सोशल मीडियावर अँक्टिव्ह होत्या अथवा मोबाईल हाताळत होत्या. तर असे नाही त्या मोबाईल देखील हाताळत नव्हत्या. त्या नेहमी एका खोलीत बंद असायच्या. त्यांच्या सोबत घरातील एकमेव सदस्य नेहमी सोबत असायचा. तो म्हणजे त्यांचा टोनी नावाचा जर्मन शेफर्ड कुत्रा.

कैलाश सिंगचं घर नेहमीच शांत असायचं. त्या दोन्ही बहिणी नेहमीच आपलं जेवण कुटुंबियांपासून वेगळं बनवायच्या आणि नेहमीच त्यांचा पाळीव कुत्रा टोनीसाठी जेवणातील काही भाग राखून ठेवायच्या. त्यांची आई, गुलाबा देवी यांच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या मुली इतक्या विचित्र झाल्या होत्या की फक्त फोटो काढण्याच्या नावाने त्या प्रचंड संतापायच्या. शेजारच्या लोकांचं म्हणणं आहे की त्या अनेकदा भूत-प्रेतांबाबत बोलायच्या. त्यांच्या कुटुंबियांनाही आपल्या दोन्ही मुलींना भूत झपाटल्याचा संशय होता आणि म्हणून त्यांना उपचारांसाठी बालाजी रुग्णालयातही नेण्यात आलं. मात्र, त्यांच्या वागण्यात काहीच फरक पडला नाही.

टोनी हाच जगण्याचं एकमेव कारण

कालांतराने, त्यांचा कुत्रा टोनी हाच त्यांच्या जगण्याचं एकमेव कारण बनला. गेल्या महिन्याभरापासून टोनी पोटाच्या एका गंभीर आजाराने ग्रस्त होता. टोनीची प्रकृती बिघडत असल्याचं पाहून जियाच्या धाकट्या बहिणीची मानसिक अवस्था बिघडली. या आजारातून टोनी वाचणार नाही अशी त्यांना खात्री पटली. या नैराश्यात, बुधवारी दोन्ही बहिणींनी एक भयानक आणि टोकाचं पाऊल उचललं. त्यावेळी, त्यांनी घरात असलेलं फिनाईल प्यायलं.

दोघींनी फिनाईल प्यायल्यानंतर त्यांनी आपल्या आईला याबद्दल सांगितलं. त्यावेळी, त्यांचा भाऊ त्यांना तातडीने रुग्णालयात घेऊन गेला. मात्र, वाटतेच राधाचा मृत्यू झाला आणि उपचारांदरम्यान, जियाला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. टोनी आता वाचणार नाही, या दु:खात त्या दोघींनी सुद्धा आत्महत्या केली. आता, या प्रकरणासंबंधी काही प्रश्नांची अद्याप उत्तरे समोर आली नाहीत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close