35 वर्षीय महिला पडली 22 वर्षाच्या मुलाच्या प्रेमात पण मुलाचा काका आणिं त्याच्या मित्राची होती वेगळीच मागणी

नवी दिल्ली /विशेष प्रतिनिधी
अनैतिक संबंधात काही तरी असे घडते की दोघांपैकी एकाला जीव गमवावा लागतो. अनैतिक संबंधात काहीच प्रकरण तेही अगदी बोटावर मोजण्या इतके लग्नापर्यंत किंवा लिव्ह इन पर्यंत जातात. कारण अनैतिक संबंधात शारीरिक भूख अथवा दोघांची कमजोरी दोघांना परस्परांच्या जवळ आणत असते. आणि त्या दोघांपैकी एकाची आवश्यकता पूर्ण झाली की मग त्यांच्यात वाद निर्माण होतात. दिलीतील मंगळपुरी परिसरातून अशीच एक घटना उघड झाली आहे.
दिल्लीतल्या या भयानक घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 22 वर्षीय तरुण हा पेईंग गेस्ट म्हणून राहत होता आणि मृत महिलेबरोबर त्याचे प्रेमसंबंध असल्याची माहिती पोलिसाच्या प्राथमिक तपासात समोर आली आहे. मंगळवारी दुपारी 4.30 वाजेचा सुमारास दोघे खोलीत गेले होते. त्यानंतर काही वेळातच वाद निर्माण झाला. तो वाद असा होता की, आरोपी तरुणाचा 50 वर्षीय काका आणि काकाचा 52 वर्षीय मित्र त्या माहिसोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी त्या आरोपी मुलाकडे मागणी करू लागले. आणि सर्व प्रकार तो मुलगा त्या महिलेस सांगत होता मात्र ती महिला त्याला नकार देत होती. आणि त्यांच्यातला वाद वाढल्यानंतर आरोपीने महिलेला जमिनीवर खाली पाडून तिचा ब्लॅंकेटने गळा आवळला. त्यामुळे श्वास कोंडल्याने महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर आरोपीने मृतदेह बेड बॉक्समध्ये लपवून ठेवला. हा आरोपी तरुण त्याच्या मित्रासोबत पेइंग गेस्ट म्हणून राहत होता. या घटनेत आरोपीच्या नातेवाईकांचाही सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. सदर घटना ज्यावेळी घडत होती. त्यावेळी मुलाचे काका व त्याचे मित्र हा रूम बाहेर पहारा देत होते. आणि त्यानंतर आरोपीला पळून जाण्यास मदत देखील केली. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
घटना घडल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास पीजी मालक घरी परतल्यानंतर खोली उघडी असल्याचे त्याच्या लक्षात आले. आत गेल्यावर बेड बॉक्समधून एक पाय बाहेर दिसत असल्याने त्याने तो उघडला असता महिलेचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर तात्काळ घरमालकाने मंगोलपुरी पोलीस स्टेशनला कॉल करत सांगितलं की, पत्थर मार्केट परिसरात एका इमारतीत रूमच्या बेड बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह सापडला आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस टीम घटनास्थळी पोहोचली अशी माहिती पोलीस उपायुक्त विक्रम सिंग यांच्याकडून देण्यात आली.
मृत 35 वर्षीय महिला ही विवाहित असून तीन मुलांची आई आहे. ती मंगोलपुरी येथील रहिवासी असून धुणभांड्याचं काम करते. मंगोलपुरी परिसरातच आरोपीचं चिकनचं शॉप देखील आहे. मृत महिला ही 22 वर्षीय आरोपी तरुणासोबत काही दिवसांपासून प्रेमसंबंधात अडकली होती. मात्र मुलाचा काका आणि त्याचा मित्र यांच्या शरीरसंबंधाच्या मागणीमुळे हे हत्याकांड घडलं आहे. ही घटना पोलिसांना समजल्यानंतर चौकशी केली असता. मृतदेहाच्या गळ्यावर आणि कपाळावर जखमांचे निशाण आढळून आले आहेत. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून या संपूर्ण थरारक घटनेतील आरोपी मुलगा त्याचे 50 वर्षीय काका आणि काकाचा 52 वर्षीय मित्राला पोलिसांनी अटक केली असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, वैयक्तिक वादातून घडलेल्या या गुन्ह्याने सर्वांनाच धक्का बसला आहे.


