विदेश

समुद्राच्या लाटेने गिळली ४ कॅरेट हिऱ्याची अंगठी ?

Spread the love

 समुद्र काठावर प्रपोज करणे भोवले

कॅलिफोर्निया / नवप्रहार डेस्क

           आयुष्यात सुख दुःख येत असतात असे म्हणतात पण सुख आल्यावर दुःख गायब होत.आणि दुःख आल्यावर सुख निघून जातं याची प्रचिती अनेकांना येते.परंतु सुख आणि दुःख एकाच वेळी अनुभवायला क्वचितच मिळतात. जेस हॅरिक ला सुख आणि दुःखाचे एकाच वेळी अनुभव आले आहेत.

दोघं समुद्र किनाऱ्यावर गेले. तो गुडघ्यावर बसला आणि तिला प्रपोज केलं. नंतर तिने त्याला किस करत मिठी मारली. दोघे एकमेकांच्या मिठीत असतानाच लाट आली. त्याने प्रेयसीला वर उचलले आणि त्याचवेळी हातात असलेली ४ कॅरेट हिऱ्याची अंगठी खाली पडली.

या घटनेचा व्हिडीओ तरुणाने शेअर केला.

कॅलिफोर्नियातील समुद्रकिनाऱ्यावर हे घडले. आपल्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातल्यानंतर काही क्षणांतच जेस हॅरिकने ४ कॅरेटच्या हिऱ्याची अंगठी गमावली. त्या दोघांसह किनाऱ्यावरील नागरिकांनी रिंग शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सापडली नाही; आता एका डायव्हरने पाण्यात अंगठी शोधून देण्याची तयारी दाखवली आहे.

प्रपोज केलं, मिठी मारली आणि जोरदार लाट

आपल्या प्रेयसीला सूर्यास्ताच्या वेळी लग्नाची मागणी घालण्याचा प्लॅन करून तो गेला. पण, अवघ्या काही क्षणांतच समुद्रकिनाऱ्यावर अंगठी शोधण्याची वेळ आली, कारण एका मोठ्या लाटेने ४ कॅरेटची साखरपुड्याची अंगठी वाहून नेली.

 

 

 

सीबीएस न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, कॅलिफोर्नियातील सॅन क्लेमेंटे येथील कॅलाफिया स्टेट बीचवर जेस हॅरिकने त्याच्या प्रेयसीला लग्नाची मागणी घातली, तेव्हाच जोरदार लाट या जोडप्याच्या दिशेने आली आणि प्रेयसी भिजू नये म्हणून त्याने तिला वर उचलले होते. तिला घाईघाईत उचलून घेताना त्याची हातातील अंगठीच्या डबीवरील पकड सुटली आणि गुडघाभर पाण्यात ती डबी वाहून गेली.

हॅरिकने सांगितली घटना

या घटनेबद्दल बोलताना हॅरिकने सीबीएस न्यूजला सांगितले की, सगळं व्यवस्थित होत आणि ती पाण्यात भिजू नये म्हणून मी तिला उचलून घेतले. तिच्याकडे त्यांचे फोन, पाकीट आणि चाव्या देखील होत्या आणि खवळलेल्या लाटांमध्ये ती आणखी भिजू नये असे मला वाटले.

तिला उचलून घेतल्यानंतर लाट गेली आणि त्यावेळी साखरपुड्याची अंगठी हरवल्याचे या जोडप्याच्या लक्षात आले. पाण्यात किंवा किनाऱ्यावर अंगठीची डबी दिसेल या आशेने किनाऱ्यावरील इतर लोकांनीही त्यांना मदत केली. पण अंगठी सापडली नाही.

दरम्यान, जेसने इन्स्टाग्रामवर या घटनेचा व्हिडिओ शेअर केला असून, या क्षणाचे वर्णन आपल्या आयुष्यातील “सर्वोत्तम आणि तितकाच वेदनादायक क्षण” असे केले आहे. “ हे निसर्ग देवते, आमची अंगठी आम्हाला परत दे. स्कुबा डायव्हर्स शोध घेण्यासाठी येत आहेत,” असे तो म्हणाला.

आपल्या कुटुंबासह समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या जेसिका लिकॉन यांनी हा गोंधळ ऐकल्याचे सांगितले. सुरुवातीला तिच्या पतीला वाटले की जवळचे लोक लग्नाची मागणी यशस्वी झाल्याचा आनंद साजरा करत आहेत, परंतु परिस्थिती पूर्णपणे वेगळी असल्याचे जेसिकाच्या लगेच लक्षात आले. मेटल डिटेक्टर घेऊन आलेल्यांनी वाळूत अंगठीचा शोध घेतला, पण ती काही केल्या सापडली नाही.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close