क्राइम

पती ने पत्नी आणि प्रियकराला हॉटेल च्या खोलीत पकडले अन्…

Spread the love

बरेली / नवप्रहार टीम

               गुरुवारी करवा चौथ हा सण साजरा झाला. या दिवशी बायको नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी उपवास ठेवते.पण याच दिवशी युपी च्या बरेली मध्ये एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला आहे. येथे एका पतीने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत हॉटेल च्या खोलीत रंगेहाथ पकडले.

त्यातून पती-पत्नीच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेत. एकीकडे महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी करवा चौथचं व्रत ठेवतात. दुसरीकडे एक पती त्याच्या पत्नीला तिच्या कथित प्रियकरासोबत पकडण्यासाठी हॉटेलच्या रुममध्ये पोहोचला. पतीला बऱ्याच काळापासून पत्नीवर संशय होता. शेवटी करवा चौथच्या दिवशी त्याचा संशय सत्यात बदलला. पत्नीला दुसऱ्या युवकासोबत हॉटेलमध्ये पाहिल्यानंतर त्याने स्वत: 112 वर फोन करुन पोलिसांना बोलवून घेतलं.

 

पोलिसांनी हॉटेलचा दरवाजा उघडला, त्यावेळी पत्नी प्रियकरासोबत आत रुममध्ये होती. त्यानंतर बराचवेळ हॉटेलमध्ये गोंधळ सुरु होता. पोलीस तिघांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन आले. त्यावेळी पत्नीने पतीसोबत संसार करण्यास स्पष्टपणे नकार दिला. प्रियकरासोबतच मी जाणार असा तिने हट्ट धरला. पोलीस स्टेशनमध्येही अनेक तास हाय वोल्टेज ड्रामा सुरु होता. पतीने पोलिसांना सांगितलं की, तो बदायूचा राहणारा आहे. जवळपास वर्षभरापूर्वी त्यांचा प्रेमविवाह झाला होता. दोघांना एक बाळ सुद्धा आहे. लग्नानंतर काही काळाने पत्नीचं वर्तन बदललं असा पतीचा आरोप आहे. ती सतत दुसऱ्या युवकासोबत फोनवर बोलत रहायची. त्यावरुन दोघांमध्ये अनेक वादविवादही झाले.

पतीने हे सर्व त्याच्या डोळ्यासमोर घडताना पाहिलं

पतीने तिला दुसऱ्या युवकाबद्दल विचारलं तेव्हा तिने आरोप फेटाळून लावले. पुरावे दाखवं असं म्हटलं. मात्र, त्यानंतरही पतीचा संशय कमी झाला नाही. तो पत्नीवर नरज ठेऊन असायचा. पत्नी जवळपास दोन महिने माहेरी रहात होती. सासरी येणं ती टाळत होती. करवा चौथच्या दिवशी सुद्धा तो कुठल्या कामानिमित्ताने बरेलीला आलेला. त्यावेळी बरेली जंक्शनवर त्याला पत्नी दिसली. एक दुसरा युवक तिच्यासोबत होता.

आधीपासूनच संशय असल्याने पतीने दोघांचा पाठलाग सुरु केला. काहीवेळाने दोघे एका हॉटेलमध्ये पोहोचले. एका खोलीत गेले. पतीने हे सर्व त्याच्या डोळ्यासमोर घडताना पाहिलं. त्यानंतर 112 क्रमांकावर डायल करुन पोलिसांना बोलावलं. पोलिसांच्या उपस्थितीत हॉटेलची खोली उघडायला लावली. पत्नी दुसऱ्या युवकासोबत होती. त्यानंतर दोन्ही बाजूने जोरदार गदारोळ झाला.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close