क्राइम

गोधडी बनली जीवनरक्षक, बिबट्याचा हल्यात शेतकरी बचावाला

Spread the love

कन्नड / विशेष प्रतिनिधी

शेतात पिक असल्याने शेतकरी वन्य प्राण्यांपासून पिकांचे नुकसान वाचविण्यासाठी शेतात जागली साठी जातात. शेतातील झोपडीत झोपलेल्या शेतकऱ्यावर बिबट्याचे हल्ला केल्याची घटना कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील उपळा शिवारात बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली. शेतकऱ्याने मोठ्या हिंमतीने बिबट्याचा हल्ला परतवून लावला आहे.  शेतकऱ्याच्या हिंमतीचे कौतुक होत आहे. पण शेतकऱ्याच्या अंगावर असलेली गोधडी शेतकऱ्यासाठी जीवनरक्षक बनली आहे.

मध्यरात्रीची वेळ… शेतातील झोपडीत एकटेच झोपलेले ६५ वर्षीय वृद्ध… आणि अचानक समोर साक्षात मृत्यू बनून आलेला बिबट्या!

कन्नड तालुक्यातील भांबरवाडी येथील उपळा शिवारात बुधवारी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास हा थरार घडला. गणपत जाधव या ६५ वर्षीय शेतकऱ्याने आपल्या हिमतीच्या जोरावर बिबट्याला पळवून लावले, परंतु त्यांच्या गोधडीने त्यांचा जीव वाचवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

नेमकी कशी घडली घटना?

गणपत जाधव यांचे कन्नड-चाळीसगाव महामार्गालगत शेत असून तिथेच त्यांची झोपडी आहे. कुटुंबातील इतर सदस्य ऊसतोडणीसाठी बाहेरगावी गेल्याने जाधव घरी एकटेच होते. बुधवारी रात्री जेवण करून ते घरासमोरील बाजेवर झोपले होते. थंडी असल्यामुळे त्यांनी अंगभर गोधडी पांघरली होती, मात्र त्यांचा उजवा हात गोधडीबाहेर होता. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास एका बिबट्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. गोधडीबाहेर असलेल्या त्यांच्या उजव्या हाताच्या मनगटाला बिबट्याने जोरात चावा घेतला.

गोधडीने वाचवला जीव; काठीने केला प्रतिकार!

हल्ला होताच जाधव यांना जाग आली. मानद वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे यांनी सांगितले की, जाधव यांनी अंगभर गोधडी गुंडाळली होती, त्यामुळे बिबट्याला त्यांच्या अत्यंत संवेदनशील अशा गळ्याला पकडता आले नाही. अशा प्रकारे गोधडी जाधव यांच्यासाठी खऱ्या अर्थाने ‘सुरक्षा कवच’ ठरली. हल्ला झाला तरी जाधव यांनी हार मानली नाही. त्यांनी प्रसंगावधान राखत जवळच असलेली काठी बिबट्याच्या थेट तोंडात घातली आणि जीवाच्या आकांताने आरडाओरडा केला. जाधव यांचा हा रौद्र अवतार आणि तोंडात घुसलेली काठी पाहून बिबट्या घाबरला आणि त्याने तेथून पळ काढला. त्यांच्या आवाजाने ग्रामस्थ जागे झाले आणि त्यांनी तातडीने जाधव यांना कन्नड ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

महिनाभर वैद्यकीय निगराणीखाली

बिबट्याच्या या हल्ल्यात जाधव यांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बिबट्याचे दोन दात घुसल्याने गंभीर दुखापत झाली आहे. तसेच खांद्याखालील दंडावर बिबट्याच्या तीक्ष्ण पंजामुळे गंभीर जखमा झाल्या आहेत. त्यांना अँटी-रेबीज आणि अँटिबायोटिक इंजेक्शन्स देण्यात आली आहेत. पुढील महिनाभर त्यांना वैद्यकीय निगराणीखाली ठेवण्यात येणार असल्याची माहिती कन्नड ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अनिरुद्ध गायकवाड यांनी दिली.

वन विभागाच्या कारभारावर लोकप्रतिनिधींचा संताप

या घटनेनंतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी वन विभागाच्या कामकाजाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हा परिषद सदस्य डॉ. तृप्ती राजपूत, डॉ. दिलीपसिंग राजपूत, डॉ. संजय गव्हाणे आणि राहुल राठोड यांनी वन विभागाच्या ढिसाळ कारभारावर संताप व्यक्त केला असून, संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.

दरम्यान, या घटनेबाबत विचारणा केली असता सहायक वनसंरक्षक विशाल कवडे यांनी त्यांना याची माहिती नसल्याचे सांगत ते वैजापूर येथे असल्याचे स्पष्ट केले. वनपाल प्रवीण पारधी यांनी सांगितले की, ते छत्रपती संभाजीनगर येथे होते. घटनेचा पंचनामा करण्यासाठी लवकरच घटनास्थळी जाणार असून, तेथे वनरक्षक यशदा साळवे उपस्थित असल्याचे त्यांनी सांगितले.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close