लाचखोर आयकर अधिकारी CBI च्या जाळ्यात

मुंबई / क्राईम रिपोर्टर
बेनामी संपत्ती विरोधात सुरु असलेल्या प्रकरणात संबंधित व्यक्तीला लाच मागणाऱ्या आयकर अधिकाऱ्याला सीबीआय ने बेड्या तुला आहेत.
सुभाष यादव असे या लाचखोर निरीक्षकाचे नाव असून, तो मुंबईतील आयकर तपास शाखेशी संलग्न आहे. त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सीबीआयने ११ लाख रुपयांची रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध आयकर विभागाच्या बेनामी प्रतिबंधक युनिटकडे बेनामी मालमत्तेसंदर्भात चौकशी प्रलंबित होती. ही कारवाई दडपण्यासाठी आणि प्रकरण निकाली काढण्यासाठी यादव याने तक्रारदाराकडे सुरुवातीला २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ही रक्कम १५ लाखांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने याबाबत तातडीने सीबीआयकडे तक्रार नोंदवली.
सुभाष यादव (Subhash Yadav) असे या लाचखोर निरीक्षकाचे नाव असून, तो मुंबईतील आयकर तपास शाखेशी संलग्न आहे. त्याच्या घरावर टाकलेल्या छाप्यात सीबीआयने ११ लाख रुपयांची रोकड आणि आक्षेपार्ह कागदपत्रे हस्तगत केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराविरुद्ध आयकर विभागाच्या बेनामी प्रतिबंधक युनिटकडे बेनामी मालमत्तेसंदर्भात चौकशी प्रलंबित होती. ही कारवाई दडपण्यासाठी आणि प्रकरण निकाली काढण्यासाठी यादव याने तक्रारदाराकडे सुरुवातीला २० लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. अखेर तडजोडीअंती ही रक्कम १५ लाखांवर निश्चित करण्यात आली. तक्रारदाराने याबाबत तातडीने सीबीआयकडे तक्रार नोंदवली.
सीबीआयच्या (CBI) पथकाने मंगळवारी मुंबईत सापळा रचून सुभाष यादव याला १५ लाख रुपयांची रोख लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले. याप्रकरणी यादवसह इतर अज्ञात व्यक्तींविरुद्धही भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटकेनंतर त्याच्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या झडतीदरम्यान ११ लाख रुपयांची रोकड तसेच काही महत्त्वाची कागदपत्रे तपास यंत्रणेच्या हाती लागली आहेत.
दरम्यान, आरोपी यादवला बुधवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला शुक्रवारपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. या लाचखोरीच्या प्रकरणात आयकर विभागातील अन्य वरिष्ठ अधिकारी किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सीबीआय करत आहे.




