अल्पवयीन मुलीला घरातून उचलून नेत सात लोकांनी तोडले रात्रभर शरीराचे लचके

तपासाची चक्रे वेगाने फिरवत सातही आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात
तेलंगणा / विशेष प्रतिनिधी
अल्पवयीन मुलीचे आईवडील घरी नसल्याची संधी साधून सात नराधमांनी एका अल्पवयीन ( १५) वर्षाच्या मुलीला घरातून उचलून बाजूच्या गावात नेत तिच्यावर रात्रभर आळीपाळीने बलात्कार करत तिच्या अब्रूचे लचके तोडले. दुसऱ्या दिवशी मुलीला तिच्या गावात आणून सोडले. मुलगी रात्रभर घरी न आल्याने आईवडिलांनी शोध घेतला.दुसऱ्या दिवशी मुलगी घरी परतल्यावर तिला याबद्दल विचारणा करण्यात आली. तिने तिच्यासोबत घडलेल्या प्रकाराबद्दल घरच्यांना सांगितल्यावर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.
नेमकं प्रकरण काय आहे?
ही घटना तेलंगणातील सिद्दीपेट जिल्ह्यातील असून विजयादशमीच्या पवित्र सणाच्या दिवशीच १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तब्बल सात नराधमांनी मिळून सामूहिक अत्याचार केला आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत तीन अल्पवयीन मुलांसह सर्व सात जणांना ताब्यात घेतलं असून, या घटनेमुळे तेलंगणासह देशभरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.घरी एकटी असल्याने साधला डाव
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पीडित मुलीचे आई-वडील नेहमीप्रमाणे शेतात कामासाठी गेले होते. आई वडील घरी नसल्याची संधी साधत आरोपींनी अल्पवयीन मुलीला बळजबरीने आपल्यासोबत नेलं आणि जवळीलच एका शेजारच्या गावात तिच्यावर अमानुषपणे सामूहिक अत्याचार केला.
पीडित मुलगी संपूर्ण रात्रभर घरी परतली नसल्याने कुटुंबाने तिचा सर्वत्र शोध घ्यायला सुरुवात केली. मात्र तिचा कुठेच थांगपत्ता लागला नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आरोपींनी पीडित मुलीला तिच्या गावाजवळ आणून सोडलं. घरी पोहोचल्यानंतर पालकांनी ती रात्रभर कुठे होती आणि उशीर का झाला? याबाबत चौकशी केली. तेव्हा धीर एकवटून पीडितेनं आपल्यावर झालेल्या अत्याचाराची माहिती कुटुंबीयांना दिली.पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल; सर्व आरोपी ताब्यात
आपल्या अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच संतप्त वडिलांनी तातडीने स्थानिक पोलीस ठाणे गाठून सर्व प्रकरणाची लिखित तक्रार दाखल केली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ पावले उचलली आणि पोक्सो (POCSO) कायद्यासह भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गंभीर गुन्हा नोंदवला.
तसेच पोलिसांनी तपासाची चक्रं वेगाने फिरवत सर्व सातही आरोपींना बेड्या ठोकल्या. अटक केलेल्या आरोपींमध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत. सध्या पोलीस सातही आरोपींची कसून चौकशी करत आहेत. यात नेमका कुणाचा काय सहभाग आहे? याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र एका १५ वर्षीय मुलीवर अशाप्रकारे घरातून घेऊन जात सात जणांनी अत्याचार केल्याने खळबळ उडाली आहे.




