क्राइम

बाईक आणि वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राची दृश्यम स्टाईल हत्या 

Spread the love

पुणे / क्राईम रिपोर्टर 

       हल्लीची मुले तशी बालपणापासूनच स्मार्ट आहेत. पण सहज हाताळण्यास मिळालेले मोबाईल , क्राईम चित्रपट आणि क्राईम सिरियल , वेबसाइड पाहून ही मुले वेळेपूर्वीच वयात आलेली आहेत.इतकेच काय तर प्रोफेशनल क्रिमिनल ला मागे टाकतील अशी कृत्ये करत आहेत. नुकतीच पुणे शहरातील कासारवडवली हद्दीत २१ दिवसांपूर्वी दोन मित्रांनी मिळून आपल्या एका मित्राची हत्या केली. आणि पुरावे मिटविण्यासाठी  मृतदेह जाळला. आणि त्याचा मोबाईल बस च्या वर फेकून दिला. दृश्यम स्टाईल या मर्डर ने पोलिसांनाही २१ दिवस झुलवले.पण पोलिसांनी या हत्येचा छडा लावला.

 कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत २१ दिवसांपूर्वी एक दहावीत शिकणारा मुलगा बेपत्ता झाला होता. मुलाच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी या मुलाला शोधण्यासाठी आकाश पाताळ एक केलं.

मात्र मुलाचा कुठेच शोध लागला नाही. पोलिसांनी संबंधित मुलाच्या मित्रांकडे, कुटुंबीयांकडे चौकशी केली, ८०-९० ठिकाणचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले, तरीही मुलाचा काहीच थांगपत्ता लागला नाही. मुलगा जिवंत आहे, की त्याच्यासोबत काही घातपात घडला? याबद्दलही पोलिसांकडे काहीच माहिती नव्हती.

मात्र आता पोलिसांनी या प्रकरणाचा उलगडा केला आहे. यातील आरोपी दुसरे तिसरे कुणी नव्हे तर संबंधित मुलाच्या शाळेत शिकलेले वर्गमित्रच होते. विशेष म्हणजे मुलगा बेपत्ता झाल्यापासून हे आरोपी पोलिसांच्या समोरच होते. त्यांनी जबाबही नोंदवले होते. आपला मित्र बेपत्ता झाल्याने आपल्याला किती दु:ख झालं होतं, हेही आरोपी वर्गमित्रांनी पोलिसांना सांगितलं होतं. मात्र आता हेच वर्गमित्र मारेकरी असल्याचं तपासात समोर आलं आहे. त्यांनी पोलिसांच्या नाकाखाली राहून तब्बल २१ दिवस आपला गुन्हा लपवण्यात यशस्वी झाले. त्यांनी रचलेली स्टोरी ऐकून पोलीसही चक्रावले होते. आता या प्रकरणी पोलिसांनी १७ वयोगटातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

नेमकं काय घडलं?


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका आरोपीला नवी बाईक खरेदी करायची होती, तर दुसऱ्याला आपला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करायचा होता. पैशांची हीच हाव एका निष्पाप शाळकरी मुलाच्या जीवावर बेतली आहे. दहावीत शिकणाऱ्या आपल्याच वर्गमित्राच्या गळ्यातील सोन्याची साखळी लाटण्यासाठी दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांनी पूर्ण प्लॅनिंग करून त्याची निर्घृण हत्या केली आणि पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह जाळून टाकला. ठाण्यातील कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या धक्कादायक प्रकरणाचा पोलिसांनी तब्बल २१ दिवसांनंतर उलगडा केला असून दोन्ही १७ वर्षीय विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

मिसिंगच्या गुन्ह्यापासून सुरू झाला पोलिसांचा तपास


कासारवडवली पोलीस ठाण्यात २५ सप्टेंबर रोजी आझादनगर येथील रहिवासी चंद्रकांत कांबळे यांनी त्यांचा दहावीत शिकणारा १७ वर्षांचा मुलगा घरी परतला नसल्याची तक्रार पोलिसांना दिली होती. याप्रकरणी पोलिसांनी तातडीने शोध सुरू केला. तपासादरम्यान बेपत्ता झालेल्या मुलाच्या एका वर्गमित्राने पोलिसांना दिशाभूल करणारी माहिती दिली होती. “२४ सप्टेंबर रोजी रात्री ८.१५ वाजेच्या सुमारास तो ब्रह्मांड सर्कल येथून एका अनोळखी मुलासोबत पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिव्हा गाडीवर बसून घोडबंदर रोडकडे गेला आहे,” असा दावा त्या मित्राने केला होता.

८० ते ९० सीसीटीव्ही आणि तांत्रिक विश्लेषणाने उघड केले कृत्य


ही माहिती मिळताच पोलिसांनी परिसरातील ८० ते ९० ठिकाणचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज पडताळून पाहिले, मात्र त्यात बेपत्ता मुलगा कुठेही दिसून आला नाही. माहिती देणाऱ्या विद्यार्थ्याने अत्यंत भावनिक नाटक करत मित्र हरवल्याचे दुःख पोलिसांसमोर दाखवले होते. मात्र, तो सांगत असलेली माहिती आणि प्रत्यक्ष सीसीटीव्ही फुटेज जुळत नसल्याने पोलिसांचा संशय बळावला. पोलिसांनी संशयित मित्र आणि बेपत्ता मुलाच्या मोबाईल क्रमांकांचे तांत्रिक विश्लेषण केले. त्यातून अनेक संशयास्पद बाबी समोर आल्यानंतर पोलिसांनी १५ ऑक्टोबर रोजी त्या मित्राची पुन्हा कसून चौकशी केली. अखेर पोलिसांच्या खाक्यासमोर त्याने आपल्या एका अन्य मित्राच्या मदतीने वर्गमित्राची हत्या केल्याची धक्कादायक कबुली दिली.

वाढदिवस आणि बाईकसाठी आखला हत्येचा कट

संशयित आरोपींपैकी एकाला स्वतःचा वाढदिवस साजरा करण्यासाठी पैसे हवे होते, तर दुसऱ्याला नवी बाईक खरेदी करायची होती. आपल्याच वर्गमित्राच्या गळ्यात सोन्याची साखळी असल्याचे त्यांना ठाऊक होते. ती साखळी चोरून पैसे मिळवण्यासाठी या दोघांनी मित्राच्या हत्येचा भयंकर कट रचला. कटानुसार, २४ सप्टेंबर रोजी रात्री सिगारेट पिण्याच्या बहाण्याने त्यांनी मृत मुलाला ब्रह्मांड फेज २ येथील एका निर्जनस्थळी झाडाझुडपात नेले. तेथे पोहोचताच दोघांनी चाकूने भोसकून आणि दगडाने ठेचून आपल्याच वर्गमित्राची निर्घृण हत्या केली. त्यानंतर सोन्याची साखळी काढून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून तो जाळून टाकण्याचा प्रयत्न केला.

आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, त्यांनी दृश्यम चित्रपटाप्रमाणे मयत विद्यार्थ्याचा मोबाईल फोन एका बसवर टाकला, ज्यामुळे त्याचं लोकेशन सतत बदलत नाही. हत्येच्या तीन तासांनी तो मोबाईल बंद झाला. हत्या झाल्याचं लोकेशन आणि मोबाइलचं लोकेशन वेगवेगळं असल्याने पोलीसही चक्रावून गेले होते. मात्र आता पोलिसांनी या गुन्ह्याची उकल केली आहे. पोलिसांनी संशयितांनी दाखवलेल्या जागेवरून ब्रह्मांड फेज २ च्या झाडाझुडपातून बेपत्ता विद्यार्थ्याचा अर्धवट जळालेल्या अवस्थेतील मृतदेह ताब्यात घेतला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close