क्राइम

समृद्धी महामार्गावर पुन्हा लूट यावेळी सुद्धा पोलिसांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या

Spread the love

विशेष प्रतिनिधी/  अहिल्यानगर

 महाराष्ट्राची भाग्य रेषा समजल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर काही दिवसांपूर्वी भरधाव कार अडवून एकाच दिवशी लुटीची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणी बीड आणि धाराशिवमधून दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद केलं.

पण, समृद्धीवर दरोड्याच्या घटना काही केल्या कमी होत नाहीये. पुन्हा एकदा एका ट्रकचालकाल चाकूचा धाक दाखवून लुटलं होतं. अखेरीस, पोलिसांनी या टोळीलाही जेरबंद केलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समृद्धी महामार्गावर अहिल्यानगर पोलिसांच्या हद्दीमध्ये ८ सप्टेंबर २०२६ रोजी पहाटे १.१५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. आयशर कंपनीचा ट्रक घेऊन अभिषेक गायकवाड हे प्रवास करत होते. पण, पोल क्रमांक 508 इथं पोहोचले असताना अचानक ट्रकमध्ये बिघाड झाला. रात्रीच्या अंधारात ट्रक बंद पडल्यामुळे त्यांनी रस्त्याच्या बाजूला ट्रक घेतला आणि दुरुस्तीचं काम करत होते. त्यावेळी अज्ञात टोळी तिथे आली आणि आरोपींनी चाकूचा धाक दाखवून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. गायकवाड यांच्याकडील मोबाईल फोन, रोख रक्कम जबरीने चोरून नेली.

१५० सीसीटीव्ही आणि ४ दिवस सलग तपास

या घटनेनंतर गायकवाड यांनी कोपरगाव तालुका पोलीस ठाणे गाठलं आणि तक्रार दिली, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. आधीच समृद्धीवर दरोड्याची घटना घडली होती, त्यानंतर आता पुन्हा एकदा लुटमारीची घटना घडल्यामुळे पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली. कोपरगाव पोलिसांनी जवळपास १५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले आणि तांत्रिक विश्लेष याद्वारे तपास केला. ज्या ठिकाणी लुटमार झाली, त्या संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला. महामार्गावरील १५० सीसीटीव्ही फुटेज तपासले. सलग ४ दिवस पोलिसांनी सगळीकडे यंत्रणा कामाला लावली.

गावाच्या शिवारामध्ये दरोडेखांची मिळाली टीप

अखेर, ११ सप्टेंबर रोजी आरोपींबद्दल पोलिसांना माहिती मिळाली. कोपरगाव- शिर्डी रस्त्यावरील समृद्धी महामार्गाच्या पुलाजवळ कोकमठाण गावाच्या शिवारामध्ये दरोडेखोर दुचाकीसह थांबले असल्याची माहिती मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या टीमने लगेच परिसरात सापळा रचला आणि आरोपी धनंजय काळे (वय २७) , स्वप्नील भारूड (वय २०) , प्रशांत भारूड (वय २०) आणि शिवरंजन शिंदे (वय २२) या दरोडेखोरांना ताब्यात घेतलं आहे.

अखेरीस दरोडेखोरांना पकडलं, मुद्देमाल जप्त

पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन मोबाईल, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण 1 लाख 2 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पण, या टोळीचा चंदू तहकीक हा साथीदार फरार झालाआहे. पोलीस या आरोपीचा शोध घेत आहे. पोलिसानी आरोपींकडून २ मोबाईल फोन, २ हजार रोख आणि ८० हजारांची स्प्लेंडर बाईक असा १ लाख २ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या आरोपींना मुद्देमालासह कोपरगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात दिलं असून अधिक तपास सुरू आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close