क्राइम

शिक्षकाचे चिमुकल्या विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य

Spread the love

दुसरी ते चौथी वर्गाच्या चिमुकल्यांसोबत शिक्षकाचे गैरवर्तन, ग्रामस्थानी दिला चोप

शिक्षिकेच्या तक्रारीनंतर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल,अटक

अकोला / विशेष प्रतिनिधी 

                     वाशीम जिल्ह्याच्या काटा येथील जी.प.शाळेतून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. येथे शिक्षक असलेल्या  ५६ वर्षीय दिलीप बोरकर याने येथील १४ चिमुकल्या विद्यार्थिनी सोबत गैरकृत्य केल्याचे विद्यार्थिनींच्या तक्रारीनंतर समोर आले आहे. अन्यायग्रस्त विद्यार्थिनी याच शाळेतील शिक्षिकीकडे गेल्यावर या नराधम शिक्षकाचा हा किळसवाणा प्रकार उघड झाला आहे. शिक्षिकेने या प्रकरणाची तक्रार अधिकारी आणि विद्यार्थिनींच्या पालकांकडे केली. यानंतर सतप्त पालकांनी शिक्षकाला चांगलाच चोप दिला. दरम्यान पोलिसांनी पोहचत मुलींचे इन कॅमेरा बयान नोंदवून बोरकर याला अटक केला आहे.

शिक्षिकेच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला धक्कादायक प्रकार

दरम्यान, शाळेतील एका शिक्षिकेकडे जाऊन मुली रडू लागल्या. त्यांनी घाबरलेल्या मुलींना विश्वासात घेऊन विचारपूस केली. मुलींनी त्यांच्यासोबत नराधम शिक्षकाकडून घडलेल्या सर्व दुष्कृत्याची माहिती दिली. हा प्रकार कळतात शिक्षिकेच्या पायाखालची वाळूच सरकली. त्यांनी तत्काळ पालक आणि शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांना माहिती दिली. निष्पाप मुलींसोबत घडलेल्या भयानक कृत्यामुळे ग्रामस्थांनी आरोपी शिक्षकाला पकडून चांगलाच चोप दिला.

१४ पीडित मुलींचे जबाब नोंदवले; आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक

घटनेचे गांभीर्य ओळखून वाशीम ग्रामीण पोलिसांनी शाळेत धाव घेतली. आरोपी शिक्षकाला ताब्यात घेतले. पीडित मुली, त्यांचे पालक आणि इतर शिक्षक-शिक्षिकांकडून सखोल माहिती घेण्यात आली. पोलिसांनी सर्व १४ मुलींचे जबाब ‘इन कॅमेरा’ नोंदवले. या प्रकरणी आरोपी शिक्षक दिलीप बोरकर (वय ५६) याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच बालकांचे लैंगिक संरक्षण कायद्याच्या (पोक्सो कायदा) विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलीस प्रकरणाचा कसून तपास करीत आहे. नराधम शिक्षकाच्या विकृत कृत्यामुळे शिक्षण क्षेत्राला मोठा कलंक लागला. गुरू-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले. या नराधम शिक्षकावर कठोर शिक्षा करण्याची मागणी संतप्त पालकांनी केली आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close