क्राइम
60 पोलिसांची टीम घटना घडून 240 तासांपेक्षा जास्त अवधी तरी आरोपी सापडेना


एखादा गुन्हा घडला आणि तो ही हत्येसारखा तर पोलिस प्रशासन खडबडून जागे होते.आणि त्या आरोपीला शोधून काढण्यासाठी पोलिस रणरण पछाडतात व आरोपीला शोधून काढतात.पण निधी पटेल च्या हत्येचे गूढ उकळण्यात पोलिसांना अपयश आले आहे. या एका केसने संपूर्ण पोलीस प्रशासनाला हादरवून सोडलं आहे. एका 24 वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनियरची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली होती. या प्रकरणात 60 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची टीम तपास करत असताना एकही पुरावा सापडला नव्हता. अशातच आता मर्डर मिस्ट्रीमध्ये नवा ट्विस्ट समोर आला आहे.
निधी पटेलच्या रहस्यमय हत्येला आठवड्याहून अधिक काळ लोटला आहे, परंतु पोलीस आणि विशेष तपास पथकाला अद्यापही कोणताही सुगावा लागलेला नाही. 24 ऑगस्टच्या सकाळी निधी तिच्या घरी मृत अवस्थेत सापडली होती. मोबाईल चार्जरच्या केबल आणि कॉर्डने गळा दाबून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली होती. या प्रकरणात नवा ट्विस्ट समोर आला आहे. पोलिसांनी सांगितले की, तिच्या गुप्तांगाजवळ जखमा आढळल्या, ज्यावरून लैंगिक अत्याचाराचा संशय आहे.
आई-वडील तीर्थयात्रेला अन् निधीची जीव गेला
गोदावादी गावात राहणाऱ्या घराचा मागचा दरवाजा उघडा होता, तर पुढचा दरवाजा आतून बंद होता. निधीचे आई-वडील काही दिवसांसाठी तीर्थयात्रेला गेले होते. त्यामुळे निधी घरी एकटीच होती. याचाच फायदा नराधमाने घेतला अन् गुन्हा केल्याचं समोर आलं आहे. मागचा दरवाजा उघडा होता, त्यामुळे पोलिसांना तिच्या ओळखीच्या कोणाचा तरी यात सहभाग असल्याचा संशय आला. त्यामुळे प्रकरणातील सस्पेन्स वाढतच चालला आहे.
एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सुमारे 60 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी आहेत. हल्लेखोराने कथितरित्या शॉर्ट्सची नाडी आणि मोबाईल चार्जर केबल वापरून महिलेचा गळा दाबला. तसेच, दोन प्लास्टिकच्या पिशव्यांनी तिचा श्वास कोंडण्यात आला, ज्यात तिचा मृत्यू झाला. तपास सुरू होऊन चार दिवस झाले तरी, एसआयटीला अद्याप कोणताही धागादोरा सापडलेला नसल्यानं सुरत पोलिसांवर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित होताना दिसत आहेत.
What’s your Reaction?
+1
+1
+1
+1
+1
+1
+1




