क्राइम
नराधम कांबळे चे उत्तर ऐकून जज संतापले


न्यायाधीशांनी त्या नराधम आरोपीला विचारणा करताच त्याने दिले असे उत्तर की जज संतापले
नसरापूर / विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्र दिनाच्या दिवशी साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर गुरांच्या गोठ्यात नेऊन अत्याचार करून तिला जिवानिशी ठार मारणाऱ्या नराधम भीमराव कांबळे याला न्यायाधीशांनी तू काय केले याची आठवण कर आणि मग काय ते सांग ! असे म्हटले.यावर आरोपी कांबळे याने जे उत्तर दिले ते ऐकून न्यायाधीश जाम वैतागले.
काय म्हणाला कांबळे – कोर्टाने सांगितलं की,”तुझ्या विरोधात सर्व आरोप सिद्ध झालेत, आता तूच सांग तुला काय शिक्षा मिळावी?” यावर नराधम म्हणाला “मी तिला गाठीशेव खायला घेऊन गेलो. मी तिला मारलेलं नाही. मी तिला घेऊन जात असताना अचानक माझा पाय घसरला आणि आम्ही दोघेही खाली पडलो. त्यातच तिच्या डोक्याला गंभीर मार लागला आणि तिचा मृत्यू
झाला.” असं उत्तर त्याने दिलं. आरोपीचा हा खोटा दावा ऐकल्यानंतर न्यायाधीश संतापले.
फाशीच्या शिक्षेची मागणी
पोलिसांनी सादर केलेल्या पुराव्यांनुसार तसेच DNA अहवालावरुन आरोपीचा गुन्हा सिद्ध झाला आहे. त्यामुळे न्यायाधीशांनी त्याला म्हटले, “प्रथम तू काय कृत्य केलं आहेस त्याची आठवण कर आणि मग काय ते सांग” तसेच तुझ्याविरोधात सर्व गंभीर गुन्हे आणि पुरावे सिद्ध झाल्याचे न्यायाधीशांनी सांगितलं. सरकारी पक्षाने आरोपीला सांगितलं. सरकारी पक्षाने आरोपीला फाशीचीच शिक्षा व्हावी, अशी आग्रही मागणी लावून धरली आहे.
नेमकं प्रकरण काय?
महाराष्ट्र दिनी भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली होती. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांच्या राजगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी भीमराव कांबळे याला अटक केली. त्यानंतर कांबळे याला अटक केली. त्यानंतर त्याच्याविरोधात सबळ पुरावे गोळा केले. या खटल्यात सीसीटीव्ही फुटेज, वैद्यकीय पुरावे, न्यायवैद्यक अहवाल, प्रत्यक्षदर्शीची साक्ष, अशा विविध बाजूने तपास करून पोलिसांनी गुन्हा घडल्यानंतर १५ दिवसांत १२०० पानी आरोपपत्र न्यायालयात दाखल केले.
२९ जूनला निकाल दिला जाणार
या प्रकरणाचा अंतिम निकाल कोर्टाने राखून ठेवला असून येत्या सोमवारी निकाल जाहीर केला जाणार असल्याचे
नेकाल जाहीर केला जाणार असल्याचे कोर्टाने सांगितलं आहे. यावेळी मुलीच्या वडिलांनी कोर्टासमोर नराधमाला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. त्यामुळे २९ जूनला आरोपी भीमराव कांबळेला शिक्षा सुनावली जाणार आहे. त्यामुळे कोर्ट नराधमाला कोणती शिक्षा सुनावणार याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेले आहे.




