क्राइम

या  कारणाने पीडिता सोसत गेल्या यातना 

Spread the love

TCS बलात्कार आणि धर्मांतरण प्रकरण 

राष्ट्रीय महिला आयोगाने जाणून घेतली पीडितांची आपबीती 

नाशिक  / विशेष प्रतिनिधी 

येथील TCS कंपनीत मागील काही कालावधीपासून सुरू असलेल्या महिलांचे लैंगिक शोषण आणि धर्मपरिवर्तन यावर पीडिता गप्प का राहिल्या असा प्रश्न उपस्थित होत असताना यामागे हृदयद्रावक कारण असल्याचे समोर आले आहे. कोणा पीडितेचे वडील कॅन्सर ग्रस्त असल्याने त्यांना लागणाऱ्या औषधासाठी ,तर कोणाच्या घरात कोणीच कमावणारे नसल्याने कुटुंबाच्या उदरनिर्वासाठी तर  कोणी कुटुंबाची जबाबदारी उचलत असल्याने त्यांनी हा सगळा प्रकार सहन केल्याचे त्यांच्या आपबीती तून समोर आले आहे.

काल TCS कंपनीत जाऊन देखील पथकाने तब्बल दीड तास चौकशी केली. कंपनीतील पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, कामाचे विभाग, कॅन्टीन, वेटींग रूमची केली पाहणी. आज सलग तिसऱ्या दिवशी महिला आयोगाकडून होणार या प्रकरणाची चौकशी. राष्ट्रीय महिला आयोगाच्या टीमकडून गेल्या 2 दिवसापासून TCS प्रकरणी झाडाझडती सुरु आहे. महिलांवरील अत्याचार, विनयभंग व धर्मांतराच्या प्रयत्नांचा गंभीर आरोप आहेत.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या चार सदस्यीय पथकाची नाशिकच्या TCS कंपनीत जाऊन प्रत्यक्ष भेट व तपास. पीडित महिलांचे जबाब नोंदवून पुरावे गोळा करण्यास सुरुवात. TCS कंपनीतील कार्यालय, कॅन्टीन, वेटिंग रूमसह विविध विभागांची पाहणी. आतापर्यंत या प्रकरणी 9 गुन्ह्यांची नोंद आहे. सुरक्षा व्यवस्था व महिलांसाठीच्या सुविधांचीही तपासणी. POSH अंतर्गत तक्रार समिती कार्यरत आहे का? याची देखील चौकशी केली. चौकशी अहवाल महिला आयोगाच्या अध्यक्षांकडे सादर होणार.

निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता

नाशिक TCS प्रकरणातील फरार संशयित आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणीची शक्यता. नाशिक न्यायालयात सुनावणीची शक्यता. गेल्या काही दिवसांपासून निदा खान फरार आहे. TCS प्रकरणातील अटकेत असलेल्या संशयित आरोपींना मदत केल्याचा निदा खानवर आरोप. गेल्या काही दिवसांपासून नाशिक पोलिसांचे पथक निदा खानच्या शोधात आहे. निदा खान गरोदर असल्याची देखील माहिती आली होती समोर. निदा खानच्या वकिलानी अटकपूर्व जामीनसाठी नाशिक न्यायालयात अर्ज केला आहे. आजच्या सुनावणीत काय होणार? याकडे लक्ष

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close