महिलांचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना वश मध्ये करण्यासाठी काय करत होता लिंगपिसाट खरात

नाशिक / विशेष प्रतिनिधी
असंख्य महिलांचे लैंगिक शोषण करण्यापूर्वी लिंगपिसाट अशोक खरात महिलांना नेमके काय खायला अथवा प्यायला देत होता जेणेकरून महिला त्याघ्याकडे वशिभूत होत होत्या. हा प्रश्न आयआयटी ला पडला होता. ते जाणून घेण्यासाठी एसआयटी ने काही डॉक्टरांना भेटून त्याबद्दल माहिती गोळा केली असता धक्कादायक खुलासा समोर आला आहे. आज अशोक खरात याला न्यायालयात हजर केलं जाणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अशोक खरात याला व्हिडीओ कॉन्फ्रन्सिंगद्वारे कोर्टात हजर केलं जाणार आहे.
दरम्यान, अशोक खरात हा त्याच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या महिलांचं लैंगिक शोषण करण्यापूर्वी त्यांना वश करण्यासाठी नेमकं काय द्यायचा याचा तपास एसआयटीकडून सुरू होता. याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी एसआयटीने काही डॉक्टरांचीही चौकशी केली असून, यामधून धक्कादायक बाब समोर आली आहे.
अशोक खरातने केलेल्या लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या पीडित महिलांना त्याने नेमकं कोणतं औषध देऊन वश केलं होतं याची माहिकी मिळवण्यासाठी एसआयटीने काही डॉक्टरांची चौकशी केली आहे. अशोक खरात याने या महिलांना ओशने जल या तीर्थाच्या नावाखाली गुंगी येणारी औषधे आणि वेदनाशामक गोळ्या दिल्याचे या चौकशीमधून उघडकीस आले आहे. एवढंच नाही तर अशोक खरात याने लैंगिक शोषणामुळे गर्भवती राहिलेल्या एका महिलेला गर्भपाताच्या गोळ्याही दिल्या होत्या, अशी माहिती समोर आली आहे. दरम्यान, ही माहिती आज न्यायालयासमोर सादर केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, गुप्तधन मिळेल, आयुष्यात प्रगती होईल किंवा अपत्यप्राप्ती होईल, आर्थिक अडचणीतून बाहेर याल, पतीला नोकरी लागेल, मनासारखा पती मिळेल हे प्रश्न घेऊन भोंदू अशोक खराकडे जाणाऱ्या महिलांची संख्या ८० टक्के होती, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. व्यापाऱ्यात प्रगती होत नाही, नोकरीत प्रमोशन हवं, राजकरणात महत्त्वाचे पद कधी मिळेल, उमेदवारी मिळविण्यासाठी उपाय हे प्रश्न घेऊन व्यापारी, उच्च पदस्थ अधिकारी, राजकीय मंडळी भोंदू खरातच्या पायऱ्या झिझवत असत, असेही उघडकीस आले आहे.




