कोट्यवधी कमावणारा अनुराग द्विवेदी ईडी च्या ताब्यात

लग्नावर केले 5 कोटी खर्च, दुबई मध्ये आलिशान फ्लॅट ,चार – चार महागड्या गाड्या
नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी
वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षा कोट्यावधीत खेळणाऱ्या अनुराग द्विवेदी या तरुणाला ईडी ने चौकशी साठी ताब्यात घेतले आहे. तपासादरम्यान त्याच्या खात्यात कोट्यवधी रुपये, 4आलिशान कार आणि अनेक गोष्टी आढळून आल्या आहेत.
गमंत म्हणजे, हाच तरुण कधीकाळी गावामध्ये सायकलीवर फिरत होता. पण, अचानक असं काय केलं की त्याने इतक्या कमी वयात कोट्यवधीची माया जमवली, या तरुणाचं नाव आहे अनुराग द्विवेदी. सध्या तो ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाच्या ताब्यात आहे.
ईडी अर्थात अंमलबजावणी संचालनालयाने अलीकडे या फँटसी बॉय अनुराग द्विवेदीच्या घरावर छापा मारला. जेव्हा ईडीने छापा मारला तेव्हा त्याच्याकडील संपत्ती पाहून सगळेच अवाक् झाले. अनुराग द्विवेदी हा उत्तर प्रदेशमध्ये राहणार तरुण आहे. तो एक युट्यूबर आहे. त्याला क्रिकेटचं प्रचंड वेड आहे, या वेडातून त्याने फँटसी एपवर टीप देण्यासाठी टीम कशी लावायची यासााठी त्याने युट्यूब चॅनल सुरू केलं. पुढे टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलमधून तो लोकांना टीम लावण्याचे सल्ले देत होता.
अनुराग इथंच थांबला नाही तर या पठ्याने व्हिजन 11 नावाच्या एक अॅपला प्रमोटही करत होता. या व्हिजन 11 एपच्या मदतीने तो कोट्याधिश झाल्याचं ईडीच्या तपासात समोर आलं. ईडीने अनुरागला आधी चौकशीला बोलावलं होतं. पण, त्याने काही ईडीकडे दुर्लक्ष केलं. आता ईडीने कारवाई करत अनुरागची खाती गोठवली.
5 कोटींची कार आणि 3 कोटींची रक्कम
ईडीने जेव्हा अनुरागची खाती गोठवली तेव्हा त्याच्याकडे मोठं घबाड सापडलं. या अनुरागकडे 4 आलिशान अशा कार आहे. ज्यामध्य लॅम्बोर्गिनी ऊरस, मर्सिडिज, BMW आणि Thar अशा गाड्या आढळल्यात. एवढंच नाहीतर अलीकडेच अनुरागने दुबईमध्ये शाही लग्न केलं. एका क्रुझवर त्याने आपल्या नातेवाईकांना दुबईत बोलावल होतं. सध्या दुबईतच लपून बसला आहे. आपल्याकडे इतकी संपत्ती आहे, हे मला आताच ईडीकडून कळलं, अशी मस्करीही तो करत आहे.
अनुराग द्विवेदी नेमका आहे तरी कोण?
तर हा अनुराग द्विवेदी हा उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथील नवाबगंज भागात राहणारा एक मध्यमवर्गीय तरुण होता. त्याच्या वडिलांचं एक मेडिकल स्टोअर आहे. अनुरागने पालकांच्या दबावामुळे 9 वी पर्यंत शिक्षण घेतलं, पण त्याचं मन अभ्यासात कधीच रमलं नाही. त्यालाा क्रिकेटचं वेड होतं. 2016 च्या T 20 वर्ल्ड कपमध्ये त्याने पहिल्यांदा दुसऱ्याच्या फोनवरून ‘ड्रीम’ नावाच्या एका एपवर टीम बनवली होती. त्यानंतर त्याला याचा नाद लागला. त्याने अशा फॅटन्सी एपवर टीम बनवण्यासाठी चोरी केली. अनुरागने आपल्या काकांच्या घरातून सोन्याची चैन चोरली होती. ती विकून त्याने आपला पहिला फोन सॅमसंग जे-7प्राइम खरेदी केला. 2017 च्या आयपीएलमध्ये त्याने 3 लाख रुपये जिंकल्याचा दावा केला होता.
अनुराग बनला युट्यूबर
पुढे जाऊन त्याने 2016 मध्ये युट्यूबवर एक चॅनल सुरू केलं. सुरुवातीला दोनवेळा त्याचं चॅनेल सस्पेंड झालं होतं. पण त्याने हार मानली नाही. 2018 मध्ये त्याने ‘अनुराग द्विवेदी’ नावानं पुन्हा एक चॅनेल सुरू केलं. या चॅनलवर तो आयपीएल आणि इतर क्रिकेटच्या सामन्यासाठी टीम कशी बनवायची सांगायला लागला. एवढंच नाहीतर, कोण जिंकणार असा दावाही तो करायचा. गळ्या सोन्याची साखळी आणि मोठ-मोठ्याला गप्पा मारून तो लोकांना आकर्षित करायचा.
फॅटन्सी एपचं प्रमोशन आणि फसवणूक
युट्यूब चॅनलसोबतच त्याने टेलिग्रामवर चॅनल सुरू केलं. इथं तो लोकांना बक्षीस वाटायला. व्हिजन नावाच्या एपचं प्रमोशनही करायचा. अनुरागने व्हिजन-11, हाउजॅट यांसारख्या अनेक फॅन्सी आणि बेटिंग ॲप्सचं प्रमोशन केलं होतं. अशातच अनुरागच्या सांगण्यावरून लोकांनी पैसे लावले. छोटे पैसे लावणारे जिंकत, पण मोठी रक्कम लावताच लोक पैसे हरत होते. जिंकलेले पैसे त्यांना परत मिळाले नाहीत आणि अनुरागने त्यांना कोणतीही मदत केली नाही, असा आरोपही काही युझर्सने केला होता. त्यामुळे अचानक अनुरागने २०१९ पासून बेटिंग ॲप्सचा प्रचार करणारे जेवढे व्हिडिओ बनवले होते, ते आता त्याने डिलीट केले आहेत.
ED ने का केली अनुरागवर कारवाई?
अनुरागने बेकायदेशीर ऑनलाइन बेटिंग (जुगार) प्लॅटफॉर्मला प्रोत्साहन देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. बेकायदेशीर मार्गाने कमावलेला पैसा हवाला आणि म्यूल अकाउंट्सद्वारे दुबईतील रिअल इस्टेटमध्ये गुंतवला असल्याचा संशय ईडीला आहे. दुबईत त्याने मोठी प्रॉपर्टी खरेदी केली, असल्याचा संशयही ईडीला आहे. पश्चिम बंगाल पोलिसांनी नोंदवलेल्या एफआयआरच्या आधारे अनुरागवर कारवाई करण्यात आली. याप्रकरणी आतापर्यंत 3 जणांना अटक करण्यात आली असून एकूण 23.7 कोटींची मालमत्ता ईडीने गोठवली आहे. आता अनुरागवर ईडी काय कारवाई करते हे पाहण्याचं ठरणार आहे.




