राष्ट्रीय

संरक्षण मंत्रालयाच्या अधिकाऱ्याच्या घरात सापडले नोटांचे धबाड

Spread the love

लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआय ने केली आहे अटक

नवी दिल्ली / विशेष प्रतिनिधी

               लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या सुरक्षा उत्पादन विभागात कार्यरत लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्या घराची सीबीआय ने झडती घेतल्यावर त्यांच्या घरातून नोटांचे धबाड मिळाल्याचे सांगण्यात येत आहे.

सीबीआयच्या प्रवक्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, लेफ्टनंट कर्नल शर्मा हे संरक्षण उत्पादनांचे निर्माण आणि निर्यातीशी जोडल्या गेलेल्या अनेक खासगी कंपन्यांशी संगनमत करून फौजदारी गुन्ह्यांशी संबंधित कारवायांमध्ये गुंतले होते.

सीबीआयने केलेल्या आरोपानुसार, कंपन्यांना लाभ मिळवून देण्याच्या बदल्यात शर्मा यांनी रोख रक्कम घेतली होती. बंगळुरू स्थित एका कंपनीकडून शर्मा यांना रोकड मिळणार असल्याची माहिती सीबीआयच्या हाती लागली होती.

घरातून २.२३ कोटींची रोकड जप्त

सीबीआयने दिलेल्या माहितीनुसार राजीव यादव आणि रवजीत सिंह नावाचे दोन इसम लेफ्टनंट कर्नल दीपक कुमार शर्मा यांच्या नियमित संपर्कात होते. त्यांच्या कंपनीला लाभ मिळण्यासाठी ते अवैध मार्गांचा वापर करत होते. १८ डिसेंबर २०२५ रोजी या कंपनीच्या इशाऱ्यावर विनोद कुमार नामक व्यक्तीने दीपक कुमार शर्मा यांना ३ लाख रुपयांची लाच दिली.

शर्मा यांच्या दिल्लीस्थित घरात झडती घेतली असता २.२३ कोटी रुपयांची रोकड आणि लाच म्हणून स्वीकारलेले ३ लाख रुपये आढळून आले आहेत. तसेच श्रीगंगानगर येथील पत्नीच्या निवासस्थानाहून १० लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. शनिवारी शर्मा आणि विनोद कुमार यांना विशेष न्यायालयात सादर केले असता त्यांना २३ डिसेंबर पर्यंतची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Tags

Related Articles

Back to top button
Close
Close