शांतीचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना माचाडो यांना

ट्रम्प च्या हाती निराशा
यंदाचा शांततेचा नोबेल पुरस्कार मारिया कोरिना माचाडो यांना जाहीर झाला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केल्यानं शांततेचा नोबेल पुरस्कार गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत होता.
पण आता नोर्वेच्या समितीने शांततेचा नोबेल पुरस्कार जाहीर केला असून ट्रम्प यांचं स्वप्न भंगलंय. वेनेज्युएलाच्या महिलेनं या पुरस्कारात बाजी मारलीय.
नॉर्वेची राजधानी ओस्लो इथं नोबेल शांतता पुरस्काराची घोषणा केली गेली. यावेळी शांततेच्या पुरस्कारासाठी ३३८ जणांची शिफारस झाली होती. यात सर्वाधिक चर्चा अमेरिकेचे राष्ट्राध्यश्र डोनाल्ड ट्रम्प यांची झाली. त्यांनी स्वत: नोबेल पुरस्कारावर दावा केला होता. भारत-पाकिस्तानसह ७ देशांचं युद्ध थांबवल्यानं मला पुरस्कार मिळायला हवा असंही ट्रम्प म्हणाले होते.
व्हेनेजुएलात लोकशाहीच्या अधिकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मारिया कोरिना मचाडो यांना पुरस्कार जाहीर करण्यात आलाय. नोबेल समितीने सांगितलं की, लोकशाही अधिकारांची बाजू मांडण्यासाठी आणि त्यासाठी शांतपणे केलेल्या संघर्षासाठी हा पुरस्कार देण्यात आलाय. मारिया यांचा जन्म ७ ऑक्टोबर १९६७ रोजी वेनेजुएलाची राजधानी कराकस इथं झाला होता.
आम्ही नेहमीच धाडसी लोकांचा गौरव गेलाय. अन्यायाविरोधात उभा राहून स्वातंत्र्याची आशा कायम जिवंत ठेवली अशा लोकांना सन्मानित केलंय. गेल्या वर्षी मचाडो यांना जीव वाचवण्यासाठी लपून रहावं लागलं. जीव धोक्यात असतानाही त्यांनी देशात राहण्याचा निर्णय घेतला असं शांततेचं नोबेल जाहीर करणाऱ्या समितीने म्हटलं.
मारिया कोरिना मचाडो यांना नोबेल शांतता पुरस्काराच्या आधीही अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत. २०२४मध्ये युरोपीय संघाकडून देण्यात येणारा सखारोव्ह पुरस्कार दिला गेला होता. हा युरोपीय संघाचा सर्वोच्च मानवाधिकार पुरस्कार आहे. शांततेच्या नोबेल पुरस्कारासह त्यांना जवळपास ७ कोटी रुपये आणि मेडल मिळणार आहे.