घरात असलेली २ ते ३ कोटींची रोकड जाळली काय आहे प्रकार ?

या नंतरही त्याच्याकडे आढळून आले अवैध मार्गाने कमावलेले ३९ लाख
काळया कमाईतून जमा केलेली खरी मुद्रा जाळल्याने त्याला आणि पत्नीला अटक
बिहार / नवप्रहार ब्युरो
.पहिले वाम मार्गाने काळा पैसा जमवायचा आणि मग नंतर कारवाईच्या धाकाने तो जाळून टाकायचा असा गजब प्रकार बिहार मधून समोर आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेची कारवाई झाली तर आपण अडचणीत येऊ या भीतीने बिहार येथील अभियंत्याने त्याच्या कडे असलेला. काळा पैसा जाळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलं आहे. यानंतर ही त्याच्या कडे ३९ लाख रुपयांची रोकड आढळून आली आहे.
बिहारमध्ये ही घटना उघडकीस आली असून विनोद राय असं इंजिनिअरचं नाव आहे. तो ग्रामीण कार्य विभागात कार्यरत होता. पोलिसांनी विनोदसह त्याच्या पत्नीला नोट जाळल्या प्रकरणी आणि पुरावे मिटवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल अटक करण्यात आलीय. त्याच्यावर भ्रष्टाचार प्रकरणी वेगळा खटला चालवला जाईल.
इंजिनिअर विनोद राय गुरुवारी रात्री सीतामढीहून मोठ्या प्रमाणावर रोकड घेऊन पटनाला गेला होता. याची माहिती स्थानिक आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाला लागली. आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाचं पथक त्याच्या पटनामध्ये पोहोचलं. मात्र त्याआधीच इंजिनिअरने सगळे पैसे त्याच्या निवासस्थानी पोहोचवले होते. जेव्हा गुन्हे शाखेचं पथक छापा टाकण्यासाठी पोहोचलं तेव्हा इंजिनिअरची पत्नी घराच्या खाली उभा राहिली. तिनं गुन्हे शाखेच्या पथकाला सांगितलं की मी घरात एकटी आहे. यामुळे छापा टाकण्यासाठी गुन्हे शाखेला सकाळ होण्याची वाट बघावी लागली.
दरम्यान, इंजिनिअर घरातील वरच्या मजल्यावर असणाऱ्या खोलीत रात्रभर नोटा जाळत बसला होता. त्यानं २ ते ३ कोटी रुपयांची रोकड जाळली. पण ३९ लाख रुपये शिल्लक राहिले. शुक्रवारी सकाळ होताच गुन्हे शाखेचं पथक घरात गेलं आणि त्यांनी इंजिनिअरला ताब्यात घेतलं. त्यानंतर पाण्याच्या टाकीत मोठ्या प्रमाणावर रोकड आढळून आली.
छाप्यात घरातून साडे बारा लाखाच्या अर्धवट जळालेल्या नोटा आणि बाथरूमच्या पाईपमध्ये नोटांची जळालेली राख सापडली. ही रक्कम जवळपास २ ते ३ कोटी रुपये इतकी असावी असा अंदाज आहे.
इंजिनिअर विनोद रायकडे १०० कोटी रुपयांची मालमत्ता असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. या प्रकरणी ईडीही चौकशी करण्याची शक्यता आहे. छाप्यात विनोदकडे जमीनीचे कागदपत्र, १५ बँक खाती आणि पार्टनरशिपची कागदपत्रंही आढळली आहेत. याशिवाय २६ लाखांचे दागिने, विमा पॉलिसी, गुंतवणूक यांचीही कागदपत्रं मिळाली आहेत.