क्राइम
धक्कादायक …. मुलाकडून मुलीला भर रस्त्यात काठीने मारहाण

अकोला /विशेष प्रतिनिधी
अकोल्यातून एक धक्कादायक आणि समाजमन हेलावणारा प्रकार समोर येत आहे. येथे भर रस्त्यात एका अल्पवयीन मुलाकडून मुलीला काठीने बेदम मारहाण करण्यात येत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. मुलगी देखील अल्पवयीन आहे. ‘ तू इतर मुलाशी का बोलतेस ‘ म्हणून त्या मुलीला मारहाण करण्यात येत आहे. खदान पो.स्टे. च्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या घटनेने शहरात खळबळ माजली आहे.
राज्यभरात महिलांवर होणाऱ्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असताना अकोल्यातील एका घटनेने मोठी खळबळ उडाली आहे . ‘तू इतर मुलाशी का बोलते? या कारणावरून भर रस्त्यात एका मुलीला हातातील काठीने जबर मारहाण केल्याची घटना अकोल्यात घडली आहे .मुलगा आणि मुलगी दोघेही जण अल्पवयीन असल्याचं सांगितलं जात आहे .मारहाण करत असतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय . व्हिडिओमध्ये संबंधित मुलगा मुलीला जोरजोरात काठीने मारहाण करताना दिसतोय .तू इतर मुलांची का बोलते ?या कारणावरून त्यानेही मारहाण केल्याची प्राथमिक माहिती आहे .विशेष म्हणजे रस्त्यावर घडलेल्या या घटने दरम्यान मारहाण करत असताना कोणीही या मुलाला रोखण्याचाही प्रयत्न केलेला नाही .या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी याची गंभीर दखल घेतलीय .त्यांनी मुलीच्या कुटुंबीयांचा शोध घेत त्यांची भेट घेतल्यानंतर अखेर मुलीचे आईने मारहाण करणाऱ्या मुलाविरोधात तक्रार दाखल केली आहे .या प्रकरणात पोलिसांनी विनयभंगासह अन्य कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत .दरम्यान मारहाण करणाऱ्या मुलाचा खदान पोलीस शोध घेत आहेत .
Cookie | Duration | Description |
---|---|---|
cookielawinfo-checkbox-analytics | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Analytics". |
cookielawinfo-checkbox-functional | 11 months | The cookie is set by GDPR cookie consent to record the user consent for the cookies in the category "Functional". |
cookielawinfo-checkbox-necessary | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookies is used to store the user consent for the cookies in the category "Necessary". |
cookielawinfo-checkbox-others | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Other. |
cookielawinfo-checkbox-performance | 11 months | This cookie is set by GDPR Cookie Consent plugin. The cookie is used to store the user consent for the cookies in the category "Performance". |
viewed_cookie_policy | 11 months | The cookie is set by the GDPR Cookie Consent plugin and is used to store whether or not user has consented to the use of cookies. It does not store any personal data. |