सैनिक ईश्वर खडसे यांचा आसाम येथे मुत्यूं ; नरसिंगपूर येथे आज अंत्यसंस्कार

दर्यापूर – तालुक्यातील नरसिंगपूर येथील सुपुत्र सैनिक ईश्वर रामेश्वर खडसे (वय.३५) यांचा शुक्रवार (दि.६) आसाम येथे मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर रविवार दि.८ रोजी सकाळी अकराच्या सुमारास शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
सैनिक ईश्वर माकोडे हे भारतीय सिमेवर आसाम येथे आर्मीमध्ये मागील १४ वर्षापासून कर्तव्य बजावत होते. मागीलवर्षी ते उन्हाळ्यात गावी नरसिंगपूर येथे सुटीवर आले होते. सुटी संपल्यानंतर सैनिक ईश्वर हे पत्नी दोन मुलांसह आसाम येथील शासकीय निवासस्थानात वास्तव्यास होते. शुक्रवार दि.६. रोजी सकाळी ९ वाजताच्या सुमारास ईश्वर हे राहत्या शासकीय निवासस्थानामध्ये मुतक अवस्थेत आढळून आले असा फोन तेथील अधीकाऱ्यांचा आला असे मुत्यूं पावलेल्या सैनिकाचा मोठा भाऊ रवींद्र खडसे यांनी सांगितले . दरम्यान विर जवान ईश्वर च्या मृत्यू ची बातमी गावामध्ये पसरताच संपुर्ण गाव शोकाकुल झाले आहे. त्यांच्या मृत्यु पश्चात पत्नी, मुलगी, मुलगा, वयोवृद्ध आई, भाऊ असा आप्त परिवार आहे. ईश्वर चे पार्थिव आसाम ते दिल्ली व तेथून नागपुर येथे पोहचले आहे. रविवार दि.८ जुन रोजी सकाळी 10 वाजता मुळगाव नरसिंगपूर येथे पोहोचणार आहे. वुत्तलिहेस्तोवर मुत्यूंचे नेमके कारण समजू शकले नाही.