क्राइम

निवृत्त अभियंत्याची टीकासने वार करून हत्या 

Spread the love

मयत काँग्रेस नेत्याचा भाऊ 

अकोला /.प्रतिनिधी 

शुल्लक वादाचे रूपांतर हत्येत झाल्याचा भयंकर प्रकार अकोल्यात घडला आहे. शुल्लक वादातून निवृत्त अभियंता संजय कौसल असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते काँग्रेस चे ज्येष्ठ नेते विजय कौसल यांचे भाऊ आहेत. महेंद्र पवार असे आरोपीचे नाव आहे.

हत्या करण्यात आलेले संजय कौसल आणि मारेकरी महेंद्र पवार यांच्यात दुपारी वाद झाला होता. हाच तोच वाद विकोपाला गेला आणि त्याच रात्री महेंद्र पवारने संजय कौसल यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

 

 

सेवानिवृत्त ६० वर्षीय सार्वजनिक बांधकाम विभागाचे माजी उपअभियंता संजय कौसल हत्या प्रकरण कालपासून अकोल्यात चांगल चर्चेत आहे. अकोल्यातल्या रणपिसे नगरात सोमवारी रात्री पावणेआठ वाजताच्या सुमारास हे थरारक हत्याकांड घडलं होतं. या हत्येचे सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले आहे. दोन जणांनी संजय कौसल यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही महेंद्र पवारने कौसल यांच्या छातीवर आणि डोक्यावर धारदार लोखंडी टिकासने वार केले अन त्यांना जागीच ठार केलं.

अकोला शहरातील मुरलीधर कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये हे हत्याकांड घडलं. मारेकरी महेंद्र पवार आणि संजय कौसल हे दोघेही मुरलीधर टॉवर्समधील रहिवासी आहेत. याच अपार्टमेंटच्या गेटसमोर ही थरारक हत्याकांडाची घटना घडली होती. अपार्टमेंटच्या गेटसमोर खुर्चीवर बसलेल्या संजय कौसल यांच्यावर महेंद्र पवारने वार करून कायमचं संपवलं.

घडलं असं की, सोमवारी दुपारी संजय कौसल आणि महेंद्र पवार या दोघांमध्ये मुरलीधर कॉम्प्लेक्समध्ये पार्किंगवरून वाद झाला. त्याचाच राग महेंद्र पवारने मनात धरला. महेंद्र पवारचा राग अनावर झाला आणि त्यातूनच त्याने संजय कौसल यांची हत्या केली. महेंद्र पवार हा अतिशय रागीट व्यक्ती आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक जयवंत सातव यांनी दिली.

आरोपी महेंद्र पवारने या अगोदर देखील रागातून कॉम्प्लेक्सच्या सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला केला होता. यामध्ये सुरक्षारक्षक गंभीर स जखमी झाला होता. काही महिन्यांपूर्वीचं महेंद्र पवार हा जामिनावर बाहेर आला होता. त्यानंतर त्याने संजय कौसल यांची हत्या केली. या हत्येच्या घटनेनंतर महेहें पवार हा घटनास्थळावरून पळाला होता. मात्र पोलिसांनी 2 तासातचं अकोल्यातल्या जवाहर नगर भागातून त्याला अटक केली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close