मित्राच्या घरी तरुणी आढळली मृतावस्थेत

लखनौ / नवप्रहार ब्युरो
लखनौ शहरात घडलेल्या एका घटनेने खळबळ माजली आहे. सोबत काही प्रश्न देखील निर्माण झाले आहेत. कुटुंबीयांनी तरुणावर बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला आहे.
पोलिसांना या प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले असून, पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.
मृत तरूणीच्या बहिणींने नेमकं काय म्हटलं?
ज्या दिवशी तरूणीची हत्या झाली, त्या दिवशी मृत तरूणी आपल्या बहिणीसोबत दुकानात उपस्थितीत होती. मृत तरूणीच्या बहिणीने सांगितलं की, ‘आरोपी तरूण पवन बुधवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास दुकानात आला. तसेच बहिणीला घेऊन गेला. त्याने बहिणीला जबरदस्तीने त्याच्या भिखापूर येथील घरी घेऊन गेला. संशय आल्यानंतर मी त्याच्या घरी पोहोचली. मात्र,मुख्य दरवाजा उघडा होता आणि ग्रिल बंद होती. आतून ओरडण्याचा आवाज येत होता.
जेव्हा आत गेली, तेव्हा बहीण बेशुद्ध होऊन बेडवर पडलेली होती. पवनला तातडीने बहिणीला रूग्णालयात नेण्यास सांगितले होतं, पण त्याने ऐकले नाही. जेव्हा दबाव टाकला तेव्हा, दोघांना नदीच्या काठावर सोडून पळ काढला’. यानंतर पीडित तरूणीला रूग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मृत तरूणीच्या वडिलांनी सांगितलं की, पवन आणि त्यांची मुलगी, कॉलेजमध्ये असल्यापासून मित्र होते. परंतू अलिकडच्या काळापासून त्यांच्या वाद सुरू होते. मृत तरूणीच्या वडिलांनी पवनवर संशय व्यक्त केला आहे. पवनने प्रथम मुलीवर बलात्कार केला नंतर तिची हत्या केली, असा आरोप मृत तरूणीच्या वडिलांनी केला. या प्रकरणाची माहिती पोलिसांना देण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी सांगितलं.
काही गोष्टी संशयास्पद – मृत तरुणीच्या बहिणीने दिलेल्या बयाना नुसार पवन नावाचा तरुण दुपारी दुकानात आला आणि बहिणीला जबरदस्तीने घेऊन गेला. याचाच अर्थ असा की तो नेहमी येऊन तरुणीला असाच घेऊन जात असावा. महत्वाची बाब अशी की जर पवन तिच्या बहिणीला जबरदस्तीने घेऊन गेला होता. तर तिने याबाबत पोलिस किंवा कुटुंबियांना का कळविले नाही.