OYO हॉटेल मध्ये चालायचा भलताच प्रकार , सामाजिक सुरक्षा विभागाच्या धाडीत अनैतिक प्रकार उघड

नागपूर/ विशेष प्रतिनिधी
बाहेरून येणाऱ्या लोकांना मुक्काम करण्यासाठी चांगले हॉटेल मिळावे आणि त्यांना त्यासाठी फार त्रास होऊ नये हा त्यामागील उद्देश. पण अशा हॉटेल मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार नागपूर मध्ये पोलिस प्रशासनाच्या सामाजिक सुरक्षा विभागाच्या धाडी नंतर उघड झाला आहे.
भारतात देहविक्री कायद्याने गुन्हा आहे. मात्र आजदेखील अनेक ठिकाणी अवैधरित्या महिलांकडून देहविक्री व्यवसाय करून घेतला जातो. यात व्यवसायात अनेक महिला, तरुणींना ओढले जाते.
एकदा या जाळ्यात फसलं की महिलांना नंतर यातून बाहेर येणे कठीण होऊन बसते. यातच अडकून राहिल्याने नंतर अनेक महिलांचे आयुष्य उद्ध्वस्त होते. दरम्यान, नागपुरात असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ओयो हॉटेलमध्ये तरुणींकडून देहव्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार नागपुरातील गिट्टीखदान भागात एका हॉटेलमध्ये काही तरुणींकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात होता. त्यासाठी मोठं रॅकेट काम करत होतं. विसेष म्हणजे या हॉटेलमध्ये ग्राहकांना हुक्कादेखील पुरवला जात होता. हा प्रकार समोर आल्यानंत पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकली. पोलिसांच्या या कारवाईत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. येथून काही मुलींची सुटकादेखील करण्यात आली आहे. पोलिसांनी येथे काही आरोपींनाही अटक केलं आहे.
ओयो हॉटेलमध्ये नेमकं काय चालायचं?
पोलिसांनी या प्रकरणात भारतीय न्याय संहितेच्या तसेच हुक्का अॅक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गिट्टीखदान पोलीस स्टेशनअंतर्गत एक ओयो हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये आपल्या आर्थिक फायद्यासाठी चार पीडित मुलींकडून देहव्यवसाय करून घेतला जात होता. ही माहिती समजताच पोलिसांनी थेट हॉटेलवर धाड टाकली. या कारवाईत एकूण दोन आरोपींना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. कारवाईदरम्यान दोन आरोपी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. पोलीस या दोघांचाही कसून शोध घेत आहेत. चेतन चकोले आणि युगांत दुर्गे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
2 मोबईल, हुक्कापॉट जप्त
पोलिसांनी हॉटेलवर धाड टाकल्यानंतर तेथे 4 पीडित मुलींकडून देहविक्री व्यवसाय करून घेतले जात असल्याचे आढळले. पोलिसांनी तत्काळ या चार मुलींची आरोपींच्या ताब्यातून सुटका केली. याच हॉटेलमध्ये ग्राहकांना पिण्यासाठी हुक्का पुरविण्यात येत असल्याचेही पोलिसांना आढळले. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून 2 मोबाईल, हुक्का पॉट व इतर साहित्य असा एकूण 86 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलीस पळून गेलेल्या दोन आरोपींचा कसून शोध घेत आहेत. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोण-कोण सामील आहेत, याचाही तपास पोलीस करत आहेत.