मंदिर तोडायला गेलेल्या औरंगजेबाचे सैन्य पडले होते बेशुद्ध

औरंगजेब हा एक मुगल शासक म्हणून प्रसिद्ध होता. त्यांच्या क्रूरतेच्या अनेक घटना इतिहासात वाचायला मिळते. नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या छावा चित्रपटा नंतर पुन्हा औरंगजेब चर्चेत आला आहे. चला तर पाहू या औरंगजेब सोबत कुठे कुठली घटना घडली आहे.
. खरंतर औरंगजेबच्या शासन काळात एक हजारापेक्षा जास्त मंदिरे तोडण्यात आल्याचे म्हटले जाते. त्या ठिकाणी औरंगजेबने मंदिरे तोडून मशीद बनवली. परंतु देशात असे एक मंदिर होते, त्या ठिकाणावरुन औरंगजेबला परत यावे लागले.
देशाच्या इतिहासात औरंगजेब किती क्रूर होता, ते दर्शवणाऱ्या हजारो घटना आहेत. क्रूर औरंगजेबने भारतावर 1658 ते 1707 पर्यंत राज्य केले. या काळात त्याने लोकांवर अमानुष अत्याचार केल्या. त्याने मोठ मोठी हिंदू मंदिर तोडून त्या ठिकाणी मशीद बनवली.
औरंगजेबची संपूर्ण सेना बेशुद्ध
औरंगजेब याने काशीचे मंदिर तोडले. त्यानंतर त्याने मोर्चा भगवान राम यांचे तपोभूमी असलेल्या चित्रकूटकडे वळवला. त्याचे सैन्य मंदाकिनी नदीच्या किनाऱ्यावर पोहचले. त्या ठिकाणी रामघाटवर असलेल्या महाराजधिराज मत्यगजेंद्रनाथ मंदिरात त्याचे सैन्य आले. या मंदिराचे निर्माण ब्रम्हाजीने केले होते. त्या ठिकाणी असलेल्या शिवलिंगावर त्या सैन्याने हातोडा चालवण्याचा प्रयत्न केला. त्या सैन्याने शिवलिंगवर हातोडा उगारताच संपूर्ण सैन्य बेशुद्ध झाले. त्यामुळे औरंगजेब प्रचंड घाबरला.
औरंगजेबने असे लिहून दिले…
मत्यगजेंद्रनाथ मंदिराचे पुजारी विपिन तिवारी यांनी सांगितले की, औरंगजेब बालाजी मंदिराचे संत बालक दास यांच्याकडे पोहचला. औरंगजेबने आपले सैन्य सुस्थितीत करण्याची विनंती केली. त्यानंतर संत बालकदास यांनी एक ताम्रपत्र औरंगजेबकडून लिहून घेतले. पुन्हा चित्रकूटमधील मंदिर तोडणार नाही? असे औरंगजेबने लिहून दिले. त्यानंतर संत बालक दास यांनी एक मार्ग दाखवला.
संत बालक दास यांनी औरंगजेबला रक्षा दिली. त्याला चित्रकुटपासून दहा किलोमीटर लांब जाण्याचे सांगितले. त्यानंतर औरंगजेबचे संपूर्ण सैन्य शुद्धीवर आले. मग औरंगजेबने मंदिराच्या तामपत्रावर हजारो बिघा जमीन दान केली. त्या घटनेनंतर आजसुद्धा चित्रकुटमध्ये मत्यगजेंद्रनाथ मंदिर आणि बालाजी मंदिर आहे.