हिवरखेड येथे शिधापत्रिका धारकांकरिता ई के वाई सी करीता कॅम्प संपन्न

बाळासाहेब नेरकर कडून
महाराष्ट्र राज्यातील सर्व संबंधित शिधापत्रिका धारकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजने अंतर्गत आंतोदय,व प्राधान्य, कुटुंबांतील सर्व सदस्यांना शासनामार्फत ई के वाय सी करण्याचे आवाहन करन्यात आले आहे. त्याच अनुषंगाने हीवरखेड येथील सेवा सहकारी सोसायटी येथे रास्त धान्य दुकानदार यांनी
रेशनकार्ड धारकांच्या ईकेवायसी करणे बाबत कॅम्प आयोजित करण्यात आला. सेवा सहकारी सोसायटी तर्फे आयोजित कॅम्पला तेल्हारा तहसील येथील निरीक्षण अधिकारी कावरे मॅडम ,टोपले साहेब, नेमाडे साहेब हे सर्व अधिकारी उपस्थित होते. यावेळी दुकानदार यांनी गावातील कॅम्प मधील उपस्थित सर्व लोकांची केवायसी करण्यात केली. तसेच सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष यांच्या हस्ते निरीक्षण अधिकारी कावरे मॅडम, टोपले साहेब, नेमाडे साहेब यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. तहसील अधीकारी यांनी दुकानदार यांना मार्गदर्शन करून तालुक्यातील प्रत्येक गावात केवायसी पूर्ण कशी होईल या बाबतीत प्रत्येक गावात जाऊन कॅम्पमध्ये दुकान दारा सोबत उपस्थित राहून केवायसी पूर्ण करण्याचे काम केले आहे.