डी.एम. एक्स ग्रुप द्वारा रक्तदान शिबीर व सर्वरोग निदान शिबिर संपन्न झाले

५१ रक्तदात्यांचा सहभाग
शिवराय उत्सव समिती हिवरखेड, डीएमएक्स ग्रुप महाराष्ट्र राज्य, आशा चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजन
हिवरखेड:- शिवराय उत्सव समिती
हिवरखेड, डी एम एक्स ग्रुप महाराष्ट्र राज्य, आशा चॅरिटेबल ट्रस्ट तथा श्री सद्गुरू गजानन महाराज ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने सोलर एक्सपर्ट प्रस्तुत स्व. प्रदीप बाबाराव गडेकर स्मृती प्रित्यर्थ शिवजयंतीच्या पावन पर्वावर दि.१९ फेब्रुवारी रोजी महात्मा फुले हायस्कूल येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात ५१ रक्तदात्यांनी रक्तदान करून समाजापुढे एक आदर्श निर्माण केला. यावेळी आशा चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने २०० रुग्णांची नेत्र तपासणी व ३०० रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली. नेत्र शस्त्रक्रियेसाठी डॉ. पंजाबराव देशमुख हॉस्पिटल अमरावतीची टीम उपस्थित होती. या कार्यक्रमाला खासदार डॉ अनिल बोंडे आमदार चंदूभाऊ यावलकर सौ वसुधाताई बोंडे सरपंच सविताताई गोपाल मालपे उपसरपंच सचिन तायवाडे मनोहर आंडे निलेश शिरभाते बाबासाहेब धरमकर धनंजय उमप प्रवीण श्रीराव इंगळे मॅडम घाडेकर साहेब सतीश धोटे उपस्थित होते. राज्यसभा खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्या मार्गदर्शनाखाली ३६५ दिवस निरंतर रक्तदान अभियाना अंतर्गत या रक्तदान शिबिरामध्ये परिसरातील अनेक रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून समाजापुढे आदर्श निर्माण केला.
उन्हाळ्याच्या दिवसात होत असलेल्या रक्त तुटवड्यामुळे रुग्णांना रक्त मिळण्यास अडचण निर्माण होत आहे. दिवसेंदिवस जिल्ह्यात अपघाताचे प्रमाण वाढत चालले आहे अनेक वेळा अपघात घडल्यास वेळेवर रक्त उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णाला प्राणास मुकावे लागते. तसेच शस्त्रक्रिया करतांना रक्त मिळविण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते प्रसंगी मोठी किंमत देऊन रक्त विकत आणावे लागते. ही गंभीर समस्या लक्षात घेऊन सामाजिक कार्यात नेहमीच मोलाचा वाटा उचलणारे डी एम एक्स ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष ऋतिक मालपे यांच्या नेतृत्वात या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ऋषिकेश सावरकर, ऋतिक भोजने,ऋतिक गहूकर, रोहित उपासे, शुभम तडस, दर्शन पाचघरे, समीर दारोकर, रोहित पारधे, सारंग द्रव्येकर, कृणाल तडस, दीप देवघरे, प्रज्वल भोजने, वेदांत भेले यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे संचालन कल्पक जावरकर यांनी केले.