हिवरखेड येथील मदिना प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल चे वार्षिक स्नेहसंमेलन थाटात संपन्न …!

हिवरखेड (रूप)
बाळासाहेब नेरकर कडुन
मदिना प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल *16वे सप्तरंग 2025 वार्षिक स्नेहसंमेलन हिवरखेड येथील *बगीचा प्लॉट येथे नुकतेच 2025 रोजी मोठ्या थाटात संपन्न झाले.
मदिना प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल मधे दरवर्षी प्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी दरवर्षी स्नेहसंमेलनाचे आयोजन करण्यात येते.
विद्यार्थ्यांनी या स्नेहसंमेलनाची २०ते२५ दिवस नृत्य व्यवस्थित व्हावे यासाठी मेहनतीने सराव केला.
सप्तरंग स्नेहसंमेलन कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून लाभले हिवरखेड येथील सत्यदेवरावजी गिऱ्हे, कार्यक्रमाचे उद्घाटक अफरोज अली मीरसाहेब, राजू खान, मार्गदर्शक श्री महेंद्रजी कराळे सर,प्रमुख अतिथी मध्ये संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.वाजिद अली,रमेशदुतोडे डॉ.शकील अली मिरसाहेब, श्यामशिलजी भोपळे, अब्दुल सादिक, जमीर खान पठाण,मो.शफाकत उपस्थित होते.
प्रसंगी तसेच सावित्रीबाई फुले यांच्यासोबत काम करणारी पहिली मुस्लिम महिला शिक्षिका आदिवासी यांचा वारसा आदर्श पुढे चालवणाऱ्या हिवरखेडच्या कन्या *कु.सीमा अंजुम मो. शफाकत व कु. असमा फरहीन मो.शफाकत* या दोन विद्यार्थिनींनी, सीमा हिने सीटीईटी मध्ये 97 मार्क्स मिळवले व असमा हि अमरावती यूनिवर्सिटी मधून इतिहास विषयात मिरीट आली. यानिमित्त शाळेच्या व संस्थेच्या तर्फे या दोन्ही विद्यार्थिनींचा भव्य सत्कार घेण्यात आला.
प्रसंगी शाळेतिल विद्यार्थ्यांनी अतिशय उत्कृष्ट पणे चित्तथरारक नृत्य मान्यवरांसमोर सादर केले.आमच्या विद्यार्थ्याचे नृत्य पाहण्यासाठी गावातील प्रतिष्ठीत नागरिक,महिला,शाळेतील विद्यार्थी पालक वर्ग तसेच मोठ्या संख्येने गावातील युवक वर्ग उपस्थित होता.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मौलाना शैजाद सर यांनी विशेष प्रयत्न केले तसेच व ज्यांनी १५ते२०दिवसापासुन मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम प्रमुख अदनान जमादार यांनी अतिशय महत्त्वाची भुमिका पार पाडली.