विशेष

प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन ने देखिल केली आहे जगाच्या विनाशाबद्दल भविष्यवाणी 

Spread the love

                   भविष्याबद्दल जाणून घेण्याची सर्वानाच उत्सुकता असते. त्यासाठी तो भविष्यकाराकडे जातो. काही जगप्रसिद्ध भविष्यकारांनी जगाबद्दल भविष्यवाणी केली आहे. म्हणजेच जगात कोणत्या वर्षी काय घडेल ? जगाचा नाश केव्हा होणार ? अश्या घटनांबद्दल बाबा वेंगा, नास्त्रेंदमस यांनीं भविष्यवाणी केली आहे. प्रसिद्ध शास्त्रज्ञ न्यूटन याने देखील जगाच्या विनाशाबद्दल भविष्यवाणी केली आहे.

या शास्त्रज्ञानं अनेक शोध लावले, त्याने लावलेल्या शोधामुळे तो जगभरात ओळखला जाऊ लागला. हा व्यक्ती केवळ शास्त्रज्ञच नव्हता तर तो एक धर्म अभ्यासक देखील होता. आपण ज्या व्यक्तीबाबत बोलत आहोत तो दुसरा तिसरा कोणी नसून महान शास्त्रज्ञ आयझॅक न्यूटन आहे. न्यूटनने आपल्या एका पत्रामध्ये जगाचा अंत कधी होणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांची ही जगाविषयीची भविष्यवाणी धर्मग्रंथावर आधारीत आहेत. न्यूटनने केलेल्या भविष्यवाणीनुसार जागाचा अंत हा अवघ्या काही दशकानंतर होणार आहे.

एका पत्रात केली भविष्यवाणी

300 वर्षांपूर्वीच एका पत्रामध्ये न्यूटनने जगाच्या अंताबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. न्यूटनने केलेली ही भविष्यवाणी ही गणितीय गणनाच्या आधारावर असल्याचा दावा केला जातो. न्यूटनचा बायबलवर विश्वास होता, त्याच आधारे त्याने जग केव्हा नष्ट होणार? याबाबत भविष्यवाणी केल्याचं बोललं जातं. न्यूटनने आपल्या या पत्रात म्हटलं आहे की, एक मोठी लढाई होईल, ही लढाई म्हणजे जगाच्या अंताची सुरुवात असेल.हे जग नष्ट झाल्यानंतर पुन्हा एकदा नव्या जगाची निर्मिती होईल, ज्यामध्ये शातंताच शांतता असेल असं न्यूटनने आपल्या पत्रात म्हटलं आहे.

न्यूटनने ज्या पत्रामध्ये ही भविष्यवाणी केली आहे, ती भविष्यवाणी करताना त्याने त्याच्या काळात उपलब्ध असलेली कालमापन पद्धत आणि तारखेचा उपयोग केला आहे. त्याने जग केव्हा नष्ट होणार याबाबत मोठी भविष्यवाणी केली आहे. न्यूटनने जे भाकीत वर्तवलं आहे, त्यासाठी त्याने बायबलचा आधारा घेतला आहे. न्यूटनने आपल्या या पत्रात त्या काळातील ज्या तारखेचा उल्लेख केला आहे, त्यानुसार हे जग 2060 मध्ये नष्ट होणार आहे, असं हे पत्र सांगतं. दरम्यान अशीच काहीशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी देखील केली आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close