क्राइम

वनपालाला लाच घेताना रंगेहात अटक

Spread the love

 

शहापूर येथील कार्यालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

वरूड (ता.प्र.)  वनपरिक्षेत्र कार्यालय वरुड अंतर्गत शेकदरी बीटचे वनपाल धनंजय अरविंद भटकर यांना ४ हजार ५०० रूपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बुधवारी (१२ फेब्रुवारी) दुपारी १ वाजताच्या सुमारास सापळा रचून रंगेहात अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, तकारकर्ता हा सागवान खरेदी-विक्रीचा व्यवसाय । करतो. त्याने मौजा जरुड येथील शेतमालकासोबत त्यांच्या शेतातील ३३ सागवान झाडे विकत घेण्याबाबतचा व्यवहार केला. शेतमालकाच्या संमतीने वनविभागामार्फत । झाडे तोडण्याची परवानगी घेणे, लॉगींग पंचनामा करुन • घेण्याकरिता अर्ज करणे, तसेच वाहतूक परवाना मिळणे

याबाबतचा पाठपुरावा करण्याकरिता तक्रारदार हे एक आठवड्यापूर्वी स्वतः क्षेत्र सहायक शेकदरी सर्कल कार्यालय शहापूर येथील कार्यालयात गेले होते. त्यावेळी वनपाल धनंजय भटकर यांना भेटले. ३३ झाडांचा लॉगींग पंचनामा करुन वाहतूक परवाना मिळण्याकरिता प्रकरण वरिष्ठ कार्यालयात पाठविण्याकरिता प्रती झाड १५० रुपये प्रमाणे एकूण ४ हजार ९५० रुपये लाचेची मागणी करण्यात आली. याबाबत त्यांनी लेखी तक्रार दिली. नमुद तक्रारीच्या अनुषंगाने ११ फेब्रुवारीला करण्यात आलेल्या पडताळणी कार्यवाहीदरम्यान वनपाल यांनी ३३ झाडांकरिता एकूण ४ हजार ९५० रुपये मागितले व तडजोडीअंती ४ हजार ५०० रुपये लाचेची मागणी व स्वीकारण्याची तयारी दर्शविली.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close