‘ स्वतंत्र ‘ ला जीवनातून ‘ आझाद ‘ करण्यामागे बायकोचे षडयंत्र

गाझीपूर / नवप्रहार मीडिया
२९ सप्टेंबर रोजी मोबाईल विक्रेता स्वतंत्र भारती याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे व्यापारी दुष्मनी किंवा अन्य कारण असल्याचा पोलिसांना संशय होता. पण स्वतंत्र याच्या हत्येमागे त्याची बायको असून बायकोचे अनैतिक संबंध असल्याने तिने प्रियककांचनराच्या माध्यमातून भाडोत्री गुंडाच्या साह्याने पतीची हत्या केल्याचे समोर आले आहे.
याबाबत नुकताच पोलिसांनी खुलासा केला आहे. एसपी ओमवीर सिंह यांनी त्यांच्या कार्यालयात याबाबत पत्रकार परिषद घेऊन घटनेची संपूर्ण माहिती दिली.एसपी ओमवीर सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्वतंत्र ची पत्नी कांचन गिरी हीचे लग्नापूर्वी विरू नावाच्या तरुणाशी प्रेमसंबंध होते.त्या दोघांना लग्न करायचे होते. पण कांचन चे लग्न स्वतंत्र सोबत पक्के केले होते. कुटुंबाच्या दबाबाखाली कांचन देखील काही बोलू शकली नाही.
कांचन शरीराने स्वतंत्र सोबत असली तरी मनाने ती विरू सोबत होती. विरू आणि कांचन चे मोबाईल वर बोलणे सुरू होते. त्यांच्या प्रेमात स्वतंत्र हा सगळ्यात मोठा अडथळा होता. त्याला बाजूला कसे करावे ? या विषयाला घेऊन कांचन आणि विरू मध्ये नेहमी बोलणे व्हायचे. ऐकदाचा हा अडथळा नेहमीसाठी दूर केल्याशिवाय आपले मिलन शक्य नाही हे या दोघांना कळून चुकले होते.त्यासाठी त्यांनी स्वांत्रला मारण्याचा प्लॅन केला.
कांचनने दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी पती स्वतंत्रला दुकान बंद केल्यानंतर त्यांनी मित्राजवळ ठेवलेलं चॉकलेट आणण्यासाठी पाठवलं; मात्र रस्त्यातच वीरू आणि त्याचे दोन मित्र गोविंद यादव आणि गामा बिंद यांनी मिळून स्वतंत्रवर गोळीबार केला व फरार झाले. पोलिसांनी केलेल्या चौकशीदरम्यान या सर्व बाबी समोर आल्या आहेत. कांचनच्या मोबाइल कॉल डिटेल्सवरूनही अनेक गोष्टी उघड झाल्या आहेत. चौकशीदरम्यान कांचन हिने पतीच्या हत्येची कबुलीदेखील दिली आहे.
सध्या पोलिसांनी कांचनसह स्वतंत्र भारती यांच्यावर गोळ्या झाडणाऱ्या गोविंद यादव आणि गामा बिंद या दोन मारेकऱ्यांसह ताब्यात घेतलं असून, मुख्य आरोपी वीरू यादवचा शोध सुरू आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली होंडा शाइन दुचाकी, पिस्तुल आणि गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पत्नीसह तीन आरोपींची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.