वारी हनूमान येथील ज्ञानेश आश्रणमात सामूहिक गाथा पारायण सप्ताहाचे आयोजन
बाळासाहेब नेरकर कडुन
श्री संत वासुदेव जी महाराज स्मृती मंदिर श्री ज्ञानेश आश्रम श्रीक्षेत्र वारी भैरवगढ येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी दि. २३ l २ ते २ l ३ l २०२५ पर्यंत
भगवान श्री ज्ञानोबाराय सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी अवतीर्णोत्सव , जगद्गुरु तुकाराम महाराज त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी सदेह वैकुंठ गमन सोहळा व संत श्री वासुदेव जी महाराज अवतीर्णोत्सव तथा मूर्ती प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनाचे औचित्य साधून भव्य प्रमाणात जगद्गुरु तुकाराम महाराज गाथा सामूहिक पारायण तसेच प्रवचन सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर्हू कार्यक्रमांमध्ये दररोज पहाटे ५ ते ६ काकडा भजन , सकाळी ७ ते ८ विष्णुसहस्त्रनाम तथा गोपी गीत पठण , ९ ते १२ व दुपारी ३ ते ५ गाथा पारायण तथा प्रवचन भागवताचार्य श्री ज्ञानेश्वर महाराज वाघ यांच्या अमृततुल्य वाणीतून संपन्न होईल , ६ ते ७ हरिपाठ व रात्रौ ७ ते ९ या वेळात श्री ज्ञानेश आश्रमातील आजी माजी विद्यार्थ्यांचे हरिकीर्तनाचे कार्यक्रम होतील. तसेच दि २६ ला महाशिवरात्री तथा महाकुंभ पर्वाच्या समारोपाचे निमित्ताने वान , आड व गोमती नदीच्या त्रिवेणी संगमावर अवभृत स्नानाचा कार्यक्रम होईल. दि. २ l ३ ला पहाटे ५ ते ७ या वेळेत श्रींच्या अवतीर्णोत्सवानिमित्ताने अभिषेक तथा गुरुवर्य श्री विठ्ठल महाराज कोरडे यांचे सकाळी १० ते १२ यावेळी गोपाल काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम होईल .तसेच बाहेर गावावरून आलेल्या भाविक सद्भक्तांची सामूहिक पारायणाकरिता गाथ्यांची , निवास व भोजनाची व्यवस्था आश्रमाच्या वतीने करण्यात येईल. तरी पंचक्रोशीतील भाविक सदभक्तांनी तसेच ज्ञानेश आश्रम भक्त परिवारातील लोकांनी उपरोक्त कार्यक्रमाकरिता तन-मन-धनाने सहकार्य करण्याचे तसेच संस्थेच्या संपूर्ण आश्रयदात्यांनी व श्री माऊली सर्वांगीण विकास बालसंस्कार शिबिराच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी सप्ताहाकरिता उपस्थित राहण्याचे आवाहन श्री ज्ञान भास्कर सेवा संस्थान हिंगणी खुर्द च्या संपूर्ण विश्वस्त मंडळांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केल्याचे श्री ज्ञानेश्वर महाराज भालतिलक हे कळवितात.