महानगर पालिकेच्या वतीने 369 आशा स्वय:सेविकाचे माता व बालसंगोपन तसेच लसीकरण प्रशिक्षण समारोप संपन्न
अमरावती – सार्वजनिक आरोग्य विभाग म. न.पा अमरावती अंतर्गत 13 शहरी आरोग्य केंद्राच्या आशा स्वयंसेविका यांचे HBNC व HBYC या कार्यक्रमाचे प्रशिक्षण संपन्न झाले असून डॉ विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी तात्काळ हा कार्यक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या तसेच हा कार्यक्रम म्हणजे नवजात शिशुची ,लहान बाळा ची घरच्या घरी घ्यावयाची काळजी हे महत्वाचे समुपदेशन आशा स्वयंसेविका त्यांच्या कार्यक्षेत्रातील लाभार्थ्यांना देणार आहे समारोप कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ विशाल काळे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांनी आशा यांना मार्गदर्शन केले आपल्या कार्यक्षेत्रात गरोदर माता यांची परिपूर्ण काळजी घेणे व एकही बाळ लसीकरण पासून सुटायला नको असे सांगितले डॉ रुपेश खडसे साथ रोग नियंत्रण अधिकारी यांनी सांगितले की गरोदर माता यांना वेलो वेळी मार्गदर्शन करून आरोग्य विषयक माहिती देण्यात यावी व आशा स्वयंसेविका यांना प्रशिक्षित करणारे प्रशिक्षक डॉ. स्वाती कोवे माता व बालसंगोपन अधिकारी ,डॉ. पौर्णिमा उघडे वैद्यकीय अधिकारी ,डॉ.मानसी मुरके (काबरा)वैद्यकीय अधिकारी ,डॉ.अलमास जौफशा खान वैद्यकीय अधिकारी , विलास नकाशे पिएचएन, रुपम खांडेझोड अकांऊटन ,वैशाली सुरोशे आरोग्य सेविका ,निकिता बडवाईक गट प्रवर्तिका उपस्थित होते.डॉ मानसी मुरके यांनी प्रास्ताविक केले तर डॉ स्वाती कोवे यांनी बालसंगोपन व लसीकरण बाबत प्रशिक्षण दिले आशा गटप्रवर्तक श्री. रुपम खंडेझोड यांनी या कार्यक्रमाचे स्वरूप तसेच आशा यांना मोलाचे मार्गदर्शन करून प्रशिक्षित केले व त्वरित कार्यक्रम राबविण्याच्या सूचना आशा स्वयंसेविका यांना दिल्या.