आपल्या कलागुणांनी चिमुकल्यांनी प्रेक्षकांचे लक्ष वेधले
मोर्शी(तालुकाप्रतिनिधी) सातपुडा पायथ्याशी वसलेल्या श्रीक्षेत्र पाळा गावातील जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेच्या चिमुकल्यांनी देशासाठी जीवनाची राख रांगोळी करणाऱ्या थोर पुरुषांच्या जीवनावर तसेच स्वच्छतेवर आधारित नृत्य भारुड गोंधळ वारकरी सांप्रदाय दिंडीसह फुले शाहू आंबेडकर यांच्या वेशात नृत्य कलाविष्कार सादर करून उपस्थित हजारो प्रेक्षकांच्या डोळ्याचे पारणे फेडले.सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. दरम्यान प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करून आकाशात तिरंगा लहरविण्यात आला.व सातपुडा विद्यालयाच्या स्काऊट गाईड पथकाने परेड संचालन करून उपस्थित मान्यवरांना मानवंदना देण्यात आली.हा प्रजासत्ताक दिन साजरा करत असतांना जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा, सातपुडा माध्यमिक विद्यालय,अंगणवाडी क्रमांक एक,अंगणवाडी क्रमांक दोन,अंगणवाडी क्रमांक तीन,यांचा प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये सहभाग होता.या सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात नन्ना मुन्ना राही हु देश का शिपाई हु या देशभक्ती गीतापासून करण्यात आली होती. सर्वधर्मीयावर आधारित समाज नृत्य,फुले शाहू आंबेडकर व देशासाठी जीवनाची राख रांगोळी करणाऱ्या थोर पुरुषांच्या जीवनावर आधारित नृत्य, स्वच्छतेवर आधारित नृत्य भारुड गोंधळ वारकरी संप्रदाय यावर चिमुकल्यांनी नृत्य अविष्कार सादर करून उपस्थित प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.