क्राइम

अधिकाऱ्याच्या गर्लफ्रेंड सोबत लैंगिक संबंधाची ईच्छा आणि त्यातुन हत्या

Spread the love

हत्या करून मृतदेह अंगणात पुरला 

नवी दिल्ली / नवप्रहार मीडिया 

                      दिल्लीत घडलेल्या एका घटनेने खळबळ माजली आहे. येथे एका व्यक्तीने आपल्या अधिकाऱ्याच्या गर्लफ्रेंड सोबत लैंगीक संबंध ठेवण्याच्या इच्छेने आपल्या साहेबाची हत्या करून मृतदेह घरातील अंगणात पुरला होता.अनीस असं आरोपीचं, तर महेश कुमार असं मृत व्यक्तीचं नाव आहे

मृत महेश कुमार सर्वे ऑफ इंडियाचा संरक्षण अधिकारी होता. तर, अनीस हा त्याचा कर्मचारी होता. अनीसला अटक केल्यानंतर त्यानं खूनाची कबुली दिली आहे. “महेश कुमारच्या गर्लफ्रेंडबरोबर मला शारीरिक संबंध ठेवायचे होते. तसेच, महेशला दिलेलं ९ लाख रूपयांचं कर्ज तो फेडत नव्हता. म्हणून त्याचा खून केला,” असा धक्कादायक खुलासा अनीसनं केला आहे.

महेशने केली होती खुनाची पूर्वतयारी – मिळालेल्या माहितीनुसार, अनीसनं महेशच्या खूनाची पूर्वतयारी केली होती. त्यानुसार २८ ऑगस्टला अनीसने कामावरून सुट्टी घेतली. लाजपत नगर आणि साउथ अक्स्टेंशन येथील मार्केटमधून ६ फूट पॉलिथिन आणि एक फावडं अनीसनं विकत घेतलं. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याने महेश कुमारला आरके पुरम सेक्टर २ येथील निवासस्थानी भेटण्यासं बोलावलं.

अनीसनं सांगितलं की, महेशच्या डोक्यात पाईपच्या रेंचने ( नळाचा पाना ) हल्ला केला. यात महेशचा जागीचा मृत्यू झाला. खून केल्यावर दुचाकीवरून सोनीपत येथील आपल्या गावी गेलो. मोबाईल फोनही दिल्लीत ठेवला होता.

दुसऱ्या दिवशी २९ ऑगस्टला अनीस परत आला. त्याने महेशचा मृतदेह रात्री घराच्या अंगणात पुरला. तपास अधिकाऱ्याने म्हटलं की, बेपत्ता अधिकाऱ्याचा मृतदेह २ सप्टेंबर रोजी सापडला आहे. आरोपीला तातडीने अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. ‘इंडिया टुडे’नं हे वृत्त दिलं आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
1

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close