हटके

लेकीला वाघाच्या तावडीतून सोडवण्यासाठी ‘ बाप ‘  वाघाशी भिडला 

Spread the love

                   बापा साठी त्याची सगळी मुलं सारखीच. पण म्हणतात की बापाचा लेकीवर जास्त जीव असतो. आणि लेक देखील बापावर जीवापाड प्रेम करते. लग्नानंतर लेक जेव्हा सासरी जाण्यासाठी निघते तेव्हा तोंड लपवून हमसून हमसून रडणारा हा बापच असतो. लहान-मोठ्या सगळ्या संकटात तो आपल्या मुलांबरोबर खंबीरपणे उभा राहतो.

                      वाघ या शब्दातच वेगळी दहशत आहे. वाघाच्या शिकारीचे अनेक किस्से चर्चेत असतात. वाघाच्या टप्प्यात जर कोणी आला तर त्याचा गेम झालाच समजा. पण सध्या सोशल मीडियावर एक असा व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात वाघाच्या तावडीतून आपल्या मुलीला वाचवण्यासाठी वडिलांनी कशाचीही पर्वा केली नाही. व्हिड़ीओमध्ये नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

वाघाचा लेकीवर हल्ला

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ पाहून थरकाप उडेल. या व्हिडीओमध्ये एक बाप आपल्या ९ वर्षाच्या मुलीला वाचवण्यासाठी धडपड करताना दिसतोय. वाघाच्या तावडीत आलेल्या आपल्या मुलीला वाचवण्यासाठी तो जीवाचं रान करतो. अगदी त्या वाघाशी जाऊन भिडतो. त्याची मदत करण्यासाठी एक माणूसही पुढे येतो.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @lay_bhari_official या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून या व्हिडीओला ‘९ वर्षाच्या मुलीला वाघापासून वाचवण्यासाठी बापाची धडपड’ अशी कॅप्शन देण्यात आली आहे. तसच ‘बाप तो शेवटी बाप असतो, आपल्या मुलांसाठी जीव द्यायला देखील मागेपुढे बघत नाही!’ असंही लिहिलं आहे. हा व्हिडीओ व्हायरल होताच याला तब्बल १ मिलियन व्ह्युज आले आहेत. यादरम्यान, ही घटना नेमकी कुठे घडली हे अद्याप कळू शकले नाही.

युजर्सच्या प्रतिक्रिया

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल होताच अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, ‘प्रत्येक मुलीसाठी बाप वाघच असतो’ तर दुसऱ्याने ‘बाप तर बाप असतो’ अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, ‘बापाचं काळीज शेवटी’

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close