अपघात

दूचाकीच्या विचीत्र अपघात एक ठार, एक जख्मी.

Spread the love

 

घाटंजी ता प्रतिनीधी- सचिन कर्णेवार 

घाटंजी पोलीस स्टेशन अंतर्गत
घाटंजी : पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या घाटंजी ते शिरोली राज्य मार्गावर दुपारच्या सुमारास दहेगाव ते शिरोली गावाच्या मधील रस्त्यावर दुचाकीचा विचीत्र अपघात घडून एक जागीच ठार तर एक ईसम गंभीर जख्मी झाला. जख्मी स यवतमाळ येथे उपचारासाठी हलविण्यात आल्याच कळते. या अपघातातील मृतकाचे नाव विष्णू छत्रपती मडावी वय २२ वर्ष रा.बोदडी व गंभीर जखमीचे नाव बंडु गुलाबराव वारकरी वय वर्षे ६० रा. बोदडी असे आहे.
सदर घटनेची पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार दि .१७ जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास बोदडी येथून घाटंजी तालुक्याच्या ठिकाणी आले होते.परत दुचाकीने जात असतांना शिरोली ते दहेगाव शेत शिवारात मार्गावर हा अपघात झाला.अपघातात मृतक हा जागीच ठार झाला तर एक गंभीर जखमीला उपचारासाठी घाटंजी येथे ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आले. हा अपघात येवढा विचीत्र होता की मृतक हा दुचाकीवरुन गाडीचे समोरच्या भागावरून मागे पुर्णत: पलटल्या गेला. यात रक्ताचा सडा रस्त्यावर सांडलेला होता.हा विचित्र अपघात कसा घडला? याची सखोल चौकशी करून त्याचा छडा लावण्याचे आवाहन घाटंजी पोलीसापुढे उभे ठाकले आहे . यात पुढील तपास घाटंजी पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रविण तालकोकुलवार करीत आहे.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close