हटके

अन.. ती जखमी प्रियकराला घेऊन थेट पोहचली ठाण्यात 

Spread the love

चूरू  /  नवप्रहार मीडिया 

प्रेम मिळवण्यासाठी प्रियकर-प्रेयसी कुठल्याही संकटाचा सामना करण्यासाठी तयार असतात. अगदी जीवावर बेतलं तरी ते मागे हटत नाहीत. अशीच एक घटना चुरू जिल्ह्यातून समोर आली आहे. एका तरुणीच्या घरच्यांना तिच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी तिच्या प्रियकराला बेदम मारहाण केली.

               तुरळक प्रकरण सोडले तर   प्रेमसबंधला नेहमीच समाज आणि कुटुंबियांकडून

कुटुंबीयांनी प्रियकराला एवढी मारहाण केली की, त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले. पण मैत्रिणीने हार मानली नाही. तिने रुग्णालयात दाखल असलेल्या तिच्या जखमी प्रियकराला घेऊन गाझियाबाद गाठले. तिथे आर्य समाजात प्रेमविवाह केला. त्यानंतर तिने आपल्या जखमी प्रियकरासह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठून संरक्षण देण्याची मागणी केली.

आपल्या जखमी प्रियकरासह एसपी कार्यालयात पोहोचलेल्या सुजानगढ येथील 21 वर्षीय निकिताने सांगितले की, ती नर्सिंगचे प्रशिक्षण घेत आहे. 9 वर्षांपूर्वी त्याच परिसरातील थानमल याच्याशी तिची ओळख झाली. याच ओळखीचं रुपांतर नंतर प्रेमात झालं. निकिताने सांगितले की, तिच्या वडिलांनी दोनदा लग्न केले होते. वडिलांच्या निधनानंतर ती आई आणि लहान बहिणीसोबत राहते.

तिने थानमलशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. ही गोष्ट तिने आईला सांगितल्यावर तिने कोणत्याही प्रकारचा आक्षेप घेतला नाही. पण तिच्या घरातील इतर लोक प्रेमविवाहाच्या विरोधात होते. 26 जानेवारी रोजी थानमल हा दुचाकीवरून जात असताना कपिल, सुमित, लखन, पिंटू, अभिषेक, संदीप, राहुल, हरिशंकर आदी कुटुंबीबातील सदस्या त्याला रस्त्यात गाठलं. सर्वांनी मिळून लाठ्या-काठ्याने बेदम मारहाण केली.

मारहाणीत थानमल इतका जखमी झाला होता की त्याला बिकानेरला रेफर करावे लागले. यानंतर 30 जानेवारी रोजी निकिता बिकानेर रुग्णालयात पोहोचली आणि उपचार सुरू असताना जखमी थानमलला घेऊन बिकानेरहून गाझियाबादला पोहोचली. तेथे 31 जानेवारीला दोघांचे आर्य समाजात लग्न झाले. थानमल याच्यावर अद्याप उपचार सुरू आहेत. जखमी अवस्थेत त्या दोघांनी एसपी कार्यालय गाठले.

डोक्यावर पट्टी बांधलेली आणि डोळ्याला दुखापत झालेल्या अवस्थेत थानमल ठाण्यात पोहचला. निकिताने सांगितले की, थानमलने नववीपर्यंत शिक्षण घेतले असून त्यांचे प्रेमसंबंध शाळेपासूनच सुरू होते. निकिताने सांगितले की तिला अजूनही तिच्या कुटुंबीयांकडून धोका आहे. त्यामुळे दोघेही सुरक्षेसाठी एसपी कार्यालयात पोहोचले आहेत.

What’s your Reaction?
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0
+1
0

मुख्य संपादक : संजय पांडे

Related Articles

Back to top button
Close
Close